Ghaziabad House Fire Saam Tv
देश विदेश

UP Fire: गाझियाबादमध्ये एका घराला भीषण आग,आईसह ३ मुले जिवंत जळाली

Ghaziabad House Fire: येथील कांचन पार्क कॉलनीतील एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. यात एका महिलेसह तीन मुलांचा मृत्यू झालाय. रविवारी सकाळी अचानक एका घराला आग लागल्याची घटना घडली.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील एका घराला भीषण आग लागली. या आगीत घरात झोपलेल्या ४ जणांचा मृत्यू झालाय. या दुर्घटनेत आई आणि 3 मुलांचा मृत्यू झालाय. आगीचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गाझियाबाद जिल्ह्यातील लोनी पोलीस स्टेशन परिसरातील कांचन पार्क कॉलनीतील आहे. रविवारी सकाळी अचानक एका घराला आग लागल्याची घटना घडली.

घराला आग लागली तेव्हा महिला आणि तिची मुले तिसऱ्या मजल्यावर झोपली होती. बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी भिंत तोडून महिला आणि तिच्या मुलांचे मृतदेह बाहेर काढले. गुलबहार असं महिलेची नाव आहे तर मुलांचे नाव जान, शान आणि जीशान अशी आहेत.

महिलेचे वय ३२ वर्षे आणि मुलांचे वय ७ ते ९ वर्षे आहे. शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली होती. त्यावेळी तळमजल्यावरून धुराचे लोट उठले त्यामुळे वरच्या मजल्यावर झोपलेल्या महिला व तिच्या मुलांचा मृत्यू झाला. कुटुंबप्रमुख शाहनवाज कसातरी बचावलेत. शाहनवाज हे शिंपीचे काम करतात. या घरात ते बराच काळापासून राहत होते. मुख्य अग्निशमन अधिकारी (सीएफओ) राहुल यांनी सांगितले की, बचावादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी भिंत तोडली आणि त्यानंतर महिला आणि मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. घराला आग कशी लागली, याचा शोध पोलीस घेत आहेत शॉर्टसर्किटमुळे हा प्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीनंतरच सर्व काही स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT