auditor ends life  Saam tv
देश विदेश

Shocking : लग्नाला सुट्टी मिळाली नाही; लग्नाच्या एक दिवसाआधी ऑडिटरने आयुष्य संपवलं

Uttar Pradesh Shocking : लग्नाला सुट्टी न मिळाल्याने ऑडिटरने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. ऑडिटरच्या नातेवाईकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधील धक्कादायक घटना घडली

सुट्टी न मिळाल्याने कर्मचाऱ्याने आयुष्य संपवलं

लग्न घरी पसरली शोककळा, नातेवाईकांकडून कारवाईची मागणी

उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. सुट्टी न मिळाल्याने लग्नाच्या एक दिवस आधीच ऑडिटरने आयुष्य संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. ऑडिटरने टोकाचं पाऊल उचलल्याने लग्न घरी शोककळला पसरली आहे. आयुष्य संपवलेल्या २५ वर्षीय ऑडिटरच्या नातेवाईकांनी कार्यालयातील महसूल निरीक्षकावर कारवाईची मागणी केली आहे.

सुधीर कुमार कोरी असे ऑडिटरचं नाव आहे. सुधीर हा बिंदकी तालुक्यात नोकरीला होता. सुधीरची ड्युटी ही एसआयआरमधील जहानाबाद विधानसभा मतदारसंघात लागली होती. सहा महिन्यापूर्वी त्याचं लग्न ठरलं होतं. त्याच्या लग्नाची वरात सीतापूर गावात जाणार होती. घरातील नातेवाईकांनी मोठ्या जल्लोषात लग्नाची तयारी केली होती. सुधीरच्या लग्नामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र, सुधीरने टोकाचा निर्णय घेतल्याने सारं दु:खात बदललं.

कुटुंबाचा आरोप आहे की, कार्यालयातील महसूल निरीक्षक हा त्याच्यावर दबाव टाकत होता. सुधीरची बहीण अमृता उर्फ रोशनीच्या अनुसार, लग्नासाठी सुट्टी मागितली होती. परंतु लग्नासाठी सुट्टी दिली नाही. एक दिवस ड्युटी न केल्याने नोकरीतून निलंबित करण्यात येईल, असं कार्यालयातील महसूल निरीक्षकाने सांगितलं.

अमृताने पुढे सांगितलं की, सकाळच्या सुमारास त्याच्या कार्यालयातील महसूल निरीक्षक घरी आला होता. त्यावेळी देखील तो सुधीरवर ओरडला. त्यानंतर सुधीर एका खोलीत गेला. खोलीत गेल्यानंतर त्याने दरवाजा बंद करून घेतला. काही वेळाने खोलीच्या खिडकीत डोकावून पाहिल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे आढळले.

सुधीरच्या मावस भावाने सांगितलं की, 'कार्यालयातील महसूल निरीक्षकाने कामासाठी दबाव टाकला. यामुळे मानसिक तणावात गेलेल्या सुधीरने आयुष्य संपवलं. त्याच्या तोंडातून रक्त देखील पडत होते.

पोलिसांकडून तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच आयकर विभागाचं पथक आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले. नातेवाईकांनी महसूल निरीक्षक आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. सध्या पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिर्डीत झाडावर अवतरले साई? साईंच्या दर्शनासाठी उसळली गर्दी

स्मृती मंधाना-पलाशचं लग्न कुणामुळं पुढं ढकललं? संगीत सोहळ्याच्या रात्री काय घडलं? नवरदेवाच्या आईनं खरं कारण सांगितलं

Car Accident: भरधाव कारवरचा कंट्रोल सुटला, भीषण अपघातात IAS अधिकाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

कराडप्रेम धनुभाऊंना भोवणार? मुंडेंना पक्षातून काढा, सुळेंचा हल्लाबोल

Maharashtra Live News Update: निर्मला गावित अपघात प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT