UP DCM Brajesh Pathak Car Accident  Saam TV
देश विदेश

Breaking News : उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारला भीषण अपघात; २ पोलिसांसह ६ जण जखमी

उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्या ताफ्यातील कारनं एका रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. या अपघातात ६ पोलिसांसह दोन डॉक्टर जखमी झाले.

साम टिव्ही ब्युरो

लखीमपूर खेरी : उत्तरप्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्या ताफ्यातील कारनं एका रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. या अपघातात २ पोलिसांसह ६ जण जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या घटनेनं उत्तरप्रदेशात खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

प्राप्त माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक हे एका राजकीय दौऱ्यानिमित्त लखनौ येथून लखीमपूर खेरीच्या दिशेने निघाले होते. ब्रिजेश पाठक यांचा ताफा सीतापूरनजीक आला असताना, ताफ्यातील एका कारने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये २ पोलिसांसह दोन डॉक्टर आणि इतर दोन जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या पोलिसांसह डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नसून उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक हे देखील सुखरुप आहेत. अपघातानंतर ब्रिजेश हे पुढील कार्यक्रमासाठी लखीमपूर खेरीला रवाना झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

Maharashtra Live News Update: अजित पवार यांची महात्मा फुले वाड्याला भेट

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

SCROLL FOR NEXT