Physical assault by Occultist Saam Tv News
देश विदेश

Crime: मांत्रिकांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार; अंगात भूत शिरलं, उपचाराच्या नावाखाली अंधाऱ्या खोलीत नेलं अन्...

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशमध्ये मांत्रिकांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. भूतबाधा झाल्याचे सांगत एका बंद खोलीत नेत तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

Priya More

Summary -

  • भूतबाधा काढण्याच्या नावाखाली महिलेवर सामूहिक बलात्कार

  • २२ वर्षीय विवाहित महिलेवर दोघांकडून बलात्कार

  • दोन वृद्ध मांत्रिकांनी बंद खोलीत नेत केलं भयंकर कृत्य

  • दोन्ही आरोपींना पोलिसांनी केली अटक

उत्तर प्रदेशमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. महिलेच्या अंगात भूत शिरलं असल्याचे सांगून दोन मांत्रिकांनी तिच्यावर उपचार करण्याच्या नावाखाली हे भयंकर कृत्य केले. भूत काढण्याच्या बहाण्याने मांत्रिकांनी या महिलेला एका खोलीमध्ये कोंढून ठेवलं आणि त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पीडित महिलेच्या मामाने तिला मांत्रिकांकडे नेले होते. ही महिला २२ वर्षांची असून विवाहित आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मांत्रिकांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना साजेठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. या गावात राहणारी २२ वर्षीय महिला गेल्या दोन वर्षांपासून मानसिक आजाराने ग्रस्त आहे. तिच्या वडिलांनी डॉक्टरांकडे नेऊन तिच्यावर उपचार केले पण काही फायदा झाला नाही. महिलेच्या मामाच्या आग्रहावरून तिचे कुटुंबिय तिला एका मांत्रिकाकडे घेऊन गेले. मांत्रिकाने त्यांना सांगितले की महिलेला दुष्ट आत्मा किंवा भूत लागले आहे. त्यामुळे या महिलेच्या अंगात शिरलेले भूत उतरवण्यासाठी मांत्रिकाला घरी बोलावण्यात आले.

घाटमपूरमधील बसोरा येथील रहिवासी असलेल्या राम जीवन नावाचा ७० वर्षीय मांत्रिक भूतबाधा काढण्यासाठी त्यांच्या घरी आला. या मांत्रिकासोबत आणखी एक ६५ वर्षीय मांत्रिक आला होता. या मांत्रिकांनी सांगितले की महिलेच्या अंगामध्ये असलेले भूत बाहेर काढण्यासाठी तिला एकटीला खोलीत न्यावे लागेल. त्यानंतर दोघेही तिला एका खोलीत घेऊन गेले. खोलीचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर दोघांनी सर्वात आधी मंत्रोच्चार केले त्यानंतर दोन्ही तांत्रिकांनी या महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला.

खूप तास झाले खोलीचा दरवाजा उघड नव्हता त्यामुळे महिलेचे कुटुंबीय चिंतेत आले. सामूहिक बलात्कार केल्यानंतर दोन्ही आरोपी खोलीतून पळून गेले. महिला बेशुद्धावस्थेत होती. शुद्धीवर आल्यानंतर महिलेने तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितले. त्यानंतर महिलेच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांना आरोपींनी घटनास्थळापासून काही अंतरावर अटक केली. दोन्ही आरोपी सध्या तुरुंगात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT