Tilhar police station limits of Shahanjahampur
Tilhar police station limits of Shahanjahampur saam tv
देश विदेश

Uttar Pradesh Crime : संतापजनक! संगणक शिक्षकाकडून 15 विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण, शिक्षिकेनीही दिली साथ

Chandrakant Jagtap

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशात शिक्षकी पेशाला काळामी फासणारी घटना घडली आहे. येथे एका संगणक प्रशिक्षकाने 15 विद्यार्थिनींची लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाहजहांपूर येथील सरकारी कनिष्ठ शाळेतून घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळजनक उडाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे शिक्षकाच्या या घृणास्पद कृत्यात शाळेतील एका शिक्षिकेनेही त्याला साथ दिल्याचं समोर आलं आहे. मोहम्मद अली आणि साजिया अशी या दोघांची नावे आहेत. या घटनेमुळे पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अनेक मुलीसोबत अश्लील कृत्ये

शहांजहांपूरच्या तिल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका माध्यमिक शाळेशी संबंधित हे प्रकरण आहे. येथील काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शाळेत शिकवणारा शिक्षक मोहम्मद अली याने अनेक मुलीसोबत अश्लील कृत्ये आणि लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. यानंतर एका शिक्षिकेने गावकरी आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.

संतप्त पालकांनी शिक्षकाला चोपले

या घटनेविषयी कळताच अनेकांना धक्का बसला. यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात शाळेची शिक्षिका साजिया आरोपीच्या या घृणास्पद कृत्यामध्ये त्याला साथ देत असल्याचे आढळून आल्याने लोकांनी आणखी आश्चर्य व्यक्त केले आहे.

बाथरूममध्ये सापडल्या आक्षेपार्ह वस्तू

यानंतर पोलिसांनी शिक्षक आणि मुख्याध्यापक अनिल कुमार यांच्यावरही गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांना बाथरूममधून आक्षेपार्ह वस्तू सापडल्या. हे पाहता या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात येत आहेत. (Crime News)

शिक्षक, मुख्याध्यापक निलंबित

या घटनेनंतर शिक्षण विभागाने शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर कारवाई केली आहे. तसेच आरोपी प्रशिक्षकाची सेवाही समाप्त करण्यात आली आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती बीएसए कुमार गौरव यांनी यांनी दिली.

विद्यार्थिनींचे समुपदेशन करण्याचे आदेश

बीएसए कुमार गौरव यांनी सांगितले की, संपूर्ण जिल्ह्यातील मुलींच्या शाळांमध्ये विद्यार्थिनींचे समुपदेशन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे एसपी ग्रामीण संजीव बाजपेयी यांनी सांगितले की, आरोपी प्रशिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुरावे गोळा केले जात असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Ajit Pawar यांना पुतण्या Yugendra Pawar देणार आव्हान?

Today's Marathi News Live : अमोल किर्तीकर यांच्या पत्नीचाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अर्ज दाखल

Special Report : Sharad Pawar यांनी गल्ली ते दिल्ली पर्यंत फोडला घाम!

Special Report | काळ आला होता पण...हेलिकॉप्टर दुर्घटनेत अंधारे बचावल्या Jayant Patil सुद्धा सुखरूप

Special Report | Sushma Andhare यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे थोडक्यात बचावल्या

SCROLL FOR NEXT