Matunga Crime News
Matunga Crime News saam tv
देश विदेश

Crime News: एकाच कॉलेजमधील तीन विद्यार्थिनींची आत्महत्या, चौथ्या मुलीने नस कापली; प्राचार्यांच्या संशयाने खळबळ

साम टिव्ही ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीतापूर येथील एका महाविद्यालयात सात दिवसांत तीन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हा सिलसिला एवढ्यावरच थांबला नाही तर एका विद्यार्थिनीने हाताची नस कापल्याचंही समोर येत आहे.

सीतापूरमधील कमलापूर येथील आरबीएसएस महाविद्यालयात सात दिवसांत एका पाठोपाठ तीन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तिन्ही मुली अल्पवयीन आहेत. तिन्ही मुलींचे शवविच्छेदन न करताच अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

आधी अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. त्यानंतर बारावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केली. आता दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने देखील हाताची नस कापली आहे. तिची प्रकृती देखील नाजूक आहे. याप्रकरणी कॉलेज प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थिनींवर अत्याचार होत होते. (Crime News)

पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वत:हून दखल घेत गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर सुमारे डझनभर जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर एका विद्यार्थिनीने नदीत उडी मारून आत्महत्या केली. तिसऱ्या विद्यार्थिनीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.

आत्महत्या केलेल्या मुलीच्या भावाच्या म्हणण्यानुसार, मृत मुलीचा छळ करण्यात आला होता. यानंतर तिने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. आमची बहीण कुठे गेली? ती कोणाला भेटली? हे सर्व लोकांना माहीत होते. तिच्यावर अत्याचार होत होते. गावातील प्रत्येकजण घाबरला आहे, मात्र कुणीच काही बोलत नाही.

कॉलेजच्या प्राचार्यांनी सांगितले की, तिन्ही विद्यार्थिनी कॉलेजमध्ये शिकत होत्या. पण कोरोनामुळे सर्वांचे ऑनलाइन क्लासेस सुरू झाले होते. प्रत्येकाकडे मोबाईल होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही चौकशी समितीही स्थापन केली आहे.

प्राचार्य साकिब जमाल अन्सारी म्हणाले की, पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे, जो स्वत:ला आर्मी कॅप्टन म्हणवत होता. या व्यक्तीचा या मुलींशी संबंध असल्याचा संशय आहे. या मुलींना अग्निवीर बनवण्याच्या बहाण्याने तो जवळ आला. त्यानंतर मैत्री वाढली आणि त्याच्याकडे या मुलींचे काही व्हिडिओ असतील, ज्याद्वारे तो त्यांना ब्लॅकमेल करत असेल.

सीतापूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एन.पी. सिंह म्हणाले की, आम्ही प्रत्येक बाजूने विचार करत आहोत. सध्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hairfall Tips: केस गळतीच्या समस्यांवर फॉलो करा 'हे' रामबाण उपाय

Bhandardara Fireflies Festival 2024: काजव्यांची चमचम पाहण्यास भंडारद-याला येणार आहात? जाणून घ्या नियम व अटी

IPL 2024 Playoffs: प्लेऑफ्सचे ४ संघ ठरले! कुठे, केव्हा अन् कधी होणार सामने? वाचा सविस्तर

Nashik Lok Sabha: कांद्याच्या माळा घालून काही होणार नाही, सत्याग्रह करा; छगन भुजबळांचा सल्ला

Sunil Raut News : सुनिल राऊत यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT