Lucknow Crime News Saam Tv
देश विदेश

Lucknow Crime : आश्रमात साध्वीवर सामूहिक बलात्कार; महंतांचे धक्कादायक उत्तर

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील गोमतीनगर पोलीस स्टेशन परिसरात बलात्काराची खळबळजनक घटना घडली आहे.

Shivani Tichkule

Lucknow Crime News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील (Lucknow) गोमतीनगर पोलीस स्टेशन परिसरात बलात्काराची खळबळजनक घटना घडली आहे. क्रूरतेचे हे घृणास्पद प्रकरण एका आश्रमाचे आहे. येथील एका साध्वीने चार साधकांवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. जेव्हा तिने याबाबत आश्रमाच्या महंताकडे तक्रार केली तेव्हा त्यांनी तिला इथे राहायचं असेल तर हे सगळं सहन करावं लागेल असे सांगितले. (Uttar Pradesh Latest Crime News)

या प्रकरणी गोमतीनगर पोलिसांनी साध्वीच्या तक्रारीवरून चार साधकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साध्वींच्या आरोपांची चौकशी सुरू असून, त्यानंतरच आरोपींवर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

यापूर्वी पीडिता मथुरेत राहत होती

वास्तविक पीडित साध्वी ही प्रयागराज जिल्ह्यातील करचना येथील रहिवासी आहे. पीडितेने सांगितले की, येथे येण्यापूर्वी ती मथुरेतील एका आश्रममध्ये राहत होती. त्याचवेळी वर्षभरापूर्वी प्रयागराजमध्ये माघ जत्रेत त्यांची एका साधिकेशी भेट झाली. त्या साधिकेने ती लखनऊच्या गोमतीनगर येथील जानकी मंदिरातून आल्याचे सांगितले होते. (Tajya News)

पीडितेने पुढे सांगितले की, माघ मेळ्यानंतर ती सावनमध्ये साधिकेला भेटली. ती साधिका वृंदावन येथील रुक्मणी बहार आश्रमात आली होती. दरम्यान, लखनऊ येथील आपल्या आश्रमाच्या महंताने आपल्याला आपल्या आश्रमात बोलावल्याचे साधिकेने सांगितले. 4 ऑक्टोबर रोजी साधिका जी तिला लखनऊ घेऊन आली होती ती कुटुंबातील कोणीतरी आजारी असल्याचे सांगून वाराणसीला गेली.

4 ऑक्टोबर रोजी साधकांनी तिच्या जेवणात मादक पदार्थ मिसळले. त्यानंतर ती बेशुद्ध पडल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित साध्वीने सांगितले की, रात्री जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती नग्न होती. एवढेच नाही तर चारही साधक तिथे उभे होते. तिने विरोध केला असता जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प केले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : नवीकोरी स्कूटर महिन्यात खराब, पट्ट्याने शोरूमला नेली अन् पेटवून दिली, पुण्यातील घटना

Beed News: वाल्मिक कराडकडे सापडला स्पेशल फोन, भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ; बीड पोलिस संशयच्या भोवऱ्यात|VIDEO

Raigad : धक्कादायक! रायगडमध्ये उघड्या दरवाजाने एसटी धावली, व्हिडिओ व्हायरल

Gk : जगातील असे 7 देश जिथे कधीच होत नाही रात्र

Masala poha recipe: रोज कांदे पोहे खाऊन कंटाळात? मग नाश्त्याला ट्राय करा साऊथ इंडियन स्टाईल मसाला पोहे

SCROLL FOR NEXT