उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी मृत घोषित केलेला तरुण जिवंत सापडल्याचा प्रकार उत्तर प्रदेशामधून समोर आला आहे. या घटनेनंतर पोलिसांना सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. (Latest marathi News)
मेरठच्या धौराला भागात ९ सप्टेंबर रोजी पोलिसांना एक मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत आढळला आहे. स्थानिक पोलिसांनी त्यानंतर हा मृतदेह नेमका कुणाचा आहे याचा शोध सुरु केला.
मन्सूरपूर शहरात एक २० वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तरुणाच्या कुटुंबीयांनी देखील 9 सप्टेंबर रोजी सापडलेल्या मृतदेह आपल्या मुलाचा असल्याचा दावा केला.
मृतदेह सापडल्यामुळे कुटुंबीयांनी पोटच्या गोळ्याच्या अंत्यविधीची तयारी देखील केली होती. मात्र, बुधवारी सायंकाळी पोलिसांना बेपत्ता तरुण चंदीगड येथे जिवंत सापडला. बेपत्ता मुलाच्या मानेवर आणि हातावर टॅटू असल्याने हल्लेखोरांनी ओळख लपवण्यासाठी शरीराचे अवयव तोडले असावेत, असा अंदाज कुटुबीयांनी बांधला होता.
कुटुंबीय आपल्या मुलाच्या मृत्यूने दु:खात आकंठ बुडाले होते. तर दुसरीकडे त्यांचा मुलगा प्रेयसीसोबत पळून गेला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय माँटीचे त्याच भागातील एका १८ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. 28 ऑगस्ट रोजी रात्री माँटी प्रेयसीसोबत चंदीगडला पळून गेला होता. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मन्सूरपूर पोलीस ठाण्यात माँटीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, माँटीने आपल्या मुलीला फितवून पळून नेले आहे. तसेच तिच्याकडील दागिने आणि 50,000 रुपये काढून घेतले. 31 ऑगस्ट रोजी मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
गावचे प्रमुख रॉबिन चौधरी याच्यां म्हणण्यानुसार, मेरठमध्ये मृतदेह सापडल्याची माहिती तरुणाच्या कुटुंबीयांना मिळाली, त्यावेळी मुलाच्या हत्येचा तपास पोलीन नीट करत नसल्यामुळे कुटुंबीय नाराज होते. मुलाच्या कुटुंबीयांनी यासाठी आंदोलनही केले होते. मात्र त्यांचा मुलगा सुखरुप असल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र, सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा आहे, याचा शोध घेण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.