Latest Crime news Saam
देश विदेश

तरूणाच्या मोबाईलमध्ये २० अश्लील क्लिप्स अन् तरूणींच्या विक्रीचे ऑडिओ; विद्यार्थिनीच्या धाडसामुळे पितळ उघड

Latest Crime news: कानपूरमध्ये चिमुकलीच्या धाडसानं ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाचं पितळ उघड. आरोपीच्या मोबाईलमध्ये २० हून अधिक अश्लील क्लिप्स आणि ऑडिओ सापडले.

Bhagyashree Kamble

  • कानपूरमध्ये चिमुकलीच्या धाडसानं ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाचं पितळ उघड.

  • आरोपीच्या मोबाईलमध्ये २० हून अधिक अश्लील क्लिप्स आणि ऑडिओ सापडले.

  • मुलीच्या वडिलांनी आरोपीला पकडून पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

  • पोलिसांनी एफआयआर नोंदवून मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला.

यूपीतील कानपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चिमुकलीच्या धाडसामुळे तरूणाचं पितळ उघडं पडलं आहे. तरूणाच्या मोबाईलमधून २० हून अधिक तरूणींच्या अश्लील क्लिप्स सापडल्या आहेत. तसेच ऑडिओ क्लिप्सही सापडल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

नौबस्ता येथील आठवीच्या वर्गातील एक विद्यार्थिनी बऱ्याच काळापासून अस्वस्थ होती. तिने आरोप केली की, केशव उत्तम नावाचा एक तरूण तिच्यावर सतत मैत्री करण्यासाठी दबाव आणत होता. काही दिवसानंतर त्यानं तिचा अश्लील व्हिडिओ तयार केला. याच व्हिडिओच्या आधारे त्यानं मुलीला ब्लॅकमेल केलं. मुलगी याच ब्लॅकमेलला कंटाळली. तिनं वडिलांना याची माहिती दिली.

घटनेच्या दिवशी मुलीला २ तरूणांनी भेटायला बोलावून घेतलं. मुलगी तरूणाला भेटायला गेली असल्याचं कळताच वडिलांनी तेथे धाव घेतली. त्यांच्यासोबत काही ओळखीचे लोक होते. त्यांनी मिळून तरूणाला पकडले. चौकशी केल्यावर केशव या तरूणानेच व्हिडिओ शूट केली असल्याची माहिती मिळाली.

वडिलांनी केशवचा फोन शोधण्यास सुरूवात केली. फोन पाहून मुलीच्या वडिलांना धक्काच बसला. त्यात सुमारे २० तरूणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ होते. तसेच ऑडिओ क्लिपही सापडले. या ऑडिओ क्लिपमध्ये तो पैशांच्या बदल्यात मुली पाठवल्याचा उल्लेख करताना आढळला. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाला. मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. तसेच केशवचा मोबाईल पोलिसांना दिला.

पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपासाला सुरूवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, केशव उत्तम हा फतेहपूर जिल्ह्यातील जहानाबादचा रहिवासी असून, तो खासगी रूग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये काम करायचा.सध्या पोलिसांनी मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला असून, पोलीस आरोपीचा तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

Heart Attack : सोमवारीच का होतो हार्टवर अटॅक, संशोधनातून नेमकं काय समोर आलं? VIDEO

Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघड

Vice President Election: इंडिया आघाडीची मतं फुटली; कोणी केली क्रॉस व्होटींग, कुठे गेम फिरला?

SCROLL FOR NEXT