Delivery Boy Killed In Uttar Pradesh For iPhone 16 Saam Tv
देश विदेश

Crime News : १ लाखाच्या मोबाइलसाठी डिलिव्हरी बॉयचा काटा काढला, घरात बोलवून संपवलं, त्यानंतर जे केलं ते वाचून डोक्याला हात लावाल

Delivery Boy Killed In Uttar Pradesh For iPhone 16: आयफोन 16 साठी डिलिव्हरी बॉयची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीमध्ये भरून कालव्यामध्ये फेकून दिला. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

Priya More

मोबाइल युजर्समध्ये आयफोन 16 ची इतकी क्रेझ आहे की प्रत्येक जण खरेदी करताना दिसत आहे. कोणी ऑनलाइन तर कोणी आयफोन स्टोअरमध्ये जाऊन आयफोन 16 खरेदी करत आहेत. ऑनलाइन आयफोन खरेदी करण्याचे प्रमाण सध्या जास्त आहे. लखनऊमध्ये एका व्यक्तीने ऑनलाइन आयफोन ऑर्डर केला. पेमेंटसाठी त्याने कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडला. पण डिलिव्हरी बॉय आयफोन घेऊन घरी पोहचताच त्याचा घात झाला. आयफोन मागवणाऱ्याने आपल्या मित्रांच्या मदतीने डिलिव्हरी बॉयची हत्या केली आणि आयफोनची चोरी केली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरत कुमार (३० वर्षे) असं हत्या करण्यात आलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. भरत एका इ-कॉमर्स कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. नुकताच लखनऊच्या चिन्हाट येथील रहिवासी असलेल्या गजाननने कॅश ऑन डिलिव्हरी पर्याय निवडून फ्लिपकार्टवरून दीड लाखांचा आयफोन ऑर्डर केला होता. 23 सप्टेंबर रोजी निशातगंज येथे राहणारा डिलिव्हरी बॉय भरत कुमार हा आयफोन घेऊन डिलिव्हरी करण्यासाठी गेला होता.

मात्र गजानन आणि त्याच्या साथीदाराने मोबाइलची डिलिव्हरी घेऊन आलेल्या भरतची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर भरतकडे असलेले पैसे आणि मोबाइल लुटले. भरतचा मृतदेह एका गोणीत भरून तो कालव्यात टाकून देत त्याची विल्हेवाट लावली. या घटनेमध्ये गजानन हा मुख्य आरोपी आहे. तर आकाश आणि हिमांशू हे त्याचे मित्र असून त्यांनी गजाननला भरतची हत्या करण्यासाठी मदत केली. गजानन सध्या फरार आहे. तर आकाश आणि हिमांशूला पोलिसांनी अटक केली. गजानन भरतसोबत दोन महिने याच कंपनीमध्ये काम करत होता.

भरत बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यामध्ये केली होती. पोलिसांनी भरतच्या कॉल डिटेल्सवरून गजाननचा नंबर ट्रेस केला. गजाननचा मित्र आकाशची चौकशी केली असता त्याने भरतची हत्या केल्याची कबुली दिली. भरतची हत्या करून त्याचा मृतदेह इंदिरा कालव्यात फेकला असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली. याप्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

हत्या झालेल्या भरत कुमारचा भाऊ प्रेम कुमारने सांगितले की, भरत आणि गजानन हे दोघे न मित्र होते ना त्यांच्यामध्ये काही वाद होता. गजाननने कंपनीला जवळपास अडीच लाख रुपयांना गंडा घातला होता. त्याच्याकडून बरेच सामान जप्त करण्यात आले होते. त्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. सध्या तो हार्डवेअरच्या छोट्याशा दुकानात काम करत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranji Trophy 2024-25: कुंबळेनंतर दुसरा भारतीय गोलंदाज अंशुल कंबोज, एकाच इंनिगमध्ये घेतले १० विकेट्स

VIDEO : क्षणभर विश्रांती! आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद

Liver Health: हे '४' पेय करतात यकृतावर गंभीर परिणाम ; तुम्हीही करता का या पेयांचे सेवन, वेळीच व्हा सावध

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

SCROLL FOR NEXT