Uttar Pradesh Saam TV
देश विदेश

Uttar Pradesh : फक्त एका सिगरेटसाठी मित्राची दगडाने ठेचून हत्या; थरारक घटनेनं कानपूर हादरलं

Kanpur News: आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींना अटक केल्यानंतर या हत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. फक्त एका सिगरेटसाठी ४ जणांनी मिळून या तरुणाची हत्या केलीये.

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh Crime News :

गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशच्या कानपूर देहाटमध्ये एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र वेगाने फिरवली आणि आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींना अटक केल्यानंतर या हत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. फक्त एका सिगरेटसाठी ४ जणांनी मिळून या तरुणाची हत्या केलीये.

यमुना कॅनॉल पंप कॅनॉलमध्ये १० फेब्रुवारी रोजी एक मृतदेह आढळून आला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना मृतदेहाशेजारी रक्ताने माखलेला एक दगड देखील सापडला. यावरून दगडाने ठेचून तरुणाचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला.

मैनुद्दीन असं मृत मुलाचं नाव आहे. तो पाटा फाफुंड औरैया येथील रहिवासी होता. पोलिसांना तपासात या प्रकरणी ४ जणांना अटक केली आहे. यातील एक मुलगा अल्पवयीन आहे. ९ फेब्रुवारी होजी हे ४ ही तरुण सिगरेट पिण्यासाठी घराबाहेर पडले. पान टपरी जवळ पोहचल्यावर तिथे मैनुद्दीन देखील उपस्थित होता. त्या तरुणांनी त्याला सिगरेट आणण्यास सांगितले. मात्र जवळ पैसे नसल्याने त्याने नकार दिला.

आपल्याला सिगरेटसाठी नाही बोलल्याने या चारही जणांना मैनुद्दीनचा भरपूर राग आला. रागाच्या भरात त्यांनी बदला घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी मैनुद्दीनला आपल्यासोबत दारू पिण्यासाठी बोलावले आणि एका अज्ञात ठिकाणी त्याला घेऊन गेले. तेथे एकाने त्याच्या टोक्यावर दगडाने हल्ला केला. तर बाकीच्या तरुणांनी त्याची ओळख मिटवण्यासाठी चेहरा खराब करून पाण्यात फेकून दिला, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT