Uttar Pradesh Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking : धक्कादायक! अपहरण करून खोलीत डांबलं, विधवा महिलेवर सलग १२ तास आळीपाळीने अत्याचार

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या विधवा महिलेचे अपहरण करून तिच्यावर सलग १२ तास सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • वीटभट्टीवर काम करणाऱ्या विधवा महिलेवर सामूहिक अत्याचाराचा आरोप

  • आरोपींमध्ये वीटभट्टी मालक आणि त्याचे दोन साथीदार असल्याची माहिती

  • पीडितेने सुटका करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

  • घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उत्तर प्रदेशातून संतापजनक घटना समोर आली आहे. वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका विधवा महिलेवर सलग १२ तास सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे वीटभट्टी मालकाने आणि त्याच्या मित्रांनी मिळून हे घाणेरडं कृत्य केलं आहे. नराधमाच्या तावडीतून सुटका करून घेत महिलेने पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव विजय कुशवाहा असे आहे. काही दिवसांपूर्वी पीडित महिलेच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर महिलेने वीटभट्टीवर काम करण्यास सुरुवात केली. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत वीटभट्टी मालकाची तिच्यावर वाईट नजर पडली.

९ फेब्रुवारी रोजी रात्री विजय कुशवाहा याने दोन साथीदारांसह कारमधून या महिलेचे अपहरण केले. त्यानंतर तिला पडरौना येथील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. तिथेच सलग १२ तास तिच्यावर अत्याचार करण्यात आले. हे तिघे ही आळीपाळीने तिच्यावर अत्याचार करत राहीले.

महिलेने संधी मिळताच त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. त्यानंतर महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेतील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान महिलेला न्याय मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरले. तसेच या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT