Yogi Adityanath Saam Tv
देश विदेश

Political News: मुख्यमंत्र्यांना मातृशोक, ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; राजकीय वर्तुळात हळहळ

Yogi Adityanath's Mother Passes Away: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईचे निधन झाले. ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Priya More

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मातृशोक झाला. त्यांची आई सावित्री देवी यांचे आज सकाळी निधन झाले. उत्तराखंडच्या पौरी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर ब्लॉकमधील पंचूर या त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९१ वर्षांच्या होत्या. योग्य आदित्यनाथ यांच्या आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. मुख्यमंत्र्यांच्या भावाने आईचे निधन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सावित्री देवींच्या निधनाने पंचूर गाव आणि संपूर्ण परिसरात धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांच्या आई वित्री देवी यांचे शुक्रवारी सकाळी ११ वाजता यमकेश्वर येथील पंचूरमधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्या आपल्या धाकट्या मुलासोबत गावात राहत होत्या. सावित्री देवी यांचे पार्थिव शनिवारी हरिद्वारला आणले जाईल. त्याच ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील हरिद्वारला रवाना होण्याची शक्यता आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांचे वय ९१ वर्षे होते. वाढत्या वयामुळे त्या सतत आजारी पडत होत्या. १४ मे २०२४ रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना ऋषिकेश येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले होते. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात जाऊन त्यांनी भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली होती.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मूळचे उत्तराखंडच्या पौरी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर ब्लॉकमधील पंचूर गावचे रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंब आजही त्याच गावात राहते. योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांचे २०२० मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर जवळपास सहा वर्षांनी त्यांच्या आई सावित्री देवी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे योगी आदित्यनाथ यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा तूर्तास रद्द; १२ डिसेंबरला शरद पवारांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन

Mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम २ वर्ष राखडलं, कारण आलं समोर

Pregnancy Tips : नॉर्मल डिलिव्हरीसाठी गर्भवती महिलांनी खावे हे फळ; स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले फायदे

Keerthy Suresh: पत्रकार परिषदेत दिग्दर्शकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीनं सांगितलं सत्य

किचनमध्ये कांदे आणि बटाटे एकत्र ठेवावे की नाही?

SCROLL FOR NEXT