Accident  saam tv
देश विदेश

Banda Accident News : मुलीच्या लग्नाआधीच वडिलांवर काळाचा घाला; कुटुंबावर पसरली शोककळा

Vishal Gangurde

Uttar Pradesh Accident News :

उत्तर प्रदेशच्या बांदामधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. एका शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलीचं लग्न १८ एप्रिलला होतं. घरात लग्नाची तयारी होती. याचदरम्यान, लग्नाची पत्रिका वाटताना वधूच्या पित्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

रस्ते अपघातात वधू पित्याचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर शोककळा पसरली. पोलिसांनी वधू पित्याचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे. मृत शेतकऱ्याच्या नावे 4 'बीघे' जमीन आहे. वधु पित्याच्या मृत्यूने लग्न घरात दु:खाचं वातावरण झालं आहे.

अपघातची घटना कशी घडली?

पैलानी ठाणे क्षेत्रात रामलालच्या डेरामध्ये राहणारे ४५ वर्षीय जयरम हे शेती करतात. ते शेती करून कुटुंबाचं उदारनिर्वाह करत होते. जयराम हे बुधवारी सायंकाळी साडी गावात लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी निघाले होते. रस्त्यात केन नदीवर बैलगाडी चालवताना तोल ढासळला. त्यानंतर त्यांची बैलगाडी उलटली. या घटनेत ते बैलगाडीसहीत मातीच्या ढीगाऱ्याखाली दबले गेले.

या अपघातानंतर शेतात काम करणारे लोक त्यांच्या मदतीला धावले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

नातेवाईकांनी सांगितलं की, 'शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न होतं. संपूर्ण घर लग्नाच्या तयारीत होतं. जयराम यांची इच्छा होती की, मुलीचं लग्न धुमधडाक्यात करावं. मात्र, लग्नाच्या आधीच वधू पित्याचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

पोलीस अधिकारी संदीप कुमार यांनी सांगितलं की, 'बैलगाडी उलटल्याने गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या मुलीचं लग्न १८ एप्रिलला होतं. ते मुलीच्या लग्नाची लग्नपत्रिका वाटायला निघाले होते. या मृत शेतकऱ्याला प्रशासनाकडून रस्ते अपघात विमाअंतर्गत ५ लाख रुपये मिळवून देणार आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT