Narendra Modi Saam Tv
देश विदेश

UP Elections Result: कमळ फुललं, सायकल पंक्चर, हात-हत्तीचा सुफडा साफ

उत्तर प्रदेश निवडणूक २०२२ लाईव्ह अपडेट्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जात देशाला तोडण्यासाठी नाहीतर जोडण्यासाठी वापरा- मोदी

* देशात पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज हाती आले आहेत. भाजपने पाच पैकी चार राज्यांमध्ये वर्चस्व राखले आहे. उत्तरप्रदेश सारख्या लोकसंख्येने मोठ्या राज्यांत पुन्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे. या निवडणुकांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आहोरात्र मेहनत घेतली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

* उत्तरप्रदेशसारख्या राज्यांत कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. आज भाजप कार्यर्त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त झाला आहे. उत्तराखंडमध्येही दुसऱ्यांदा भाजपने आपली सत्ता कायम राखली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या व्होट शेअरमध्येही मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. गोव्यातील निकालाने सर्वजण स्तब्ध आहेत.

* निवडणूक निकालामध्ये महिलांचा फार मोठा वाटा आहे. यानिवडणूकांमध्ये महिलांनी भाजपाला पुरुषांपेक्षा जास्त मतदान केले आहे. महिला भाजपाच्या विजयाच्या सारथी बनल्या आहेत. मला स्त्री शक्तिचं कवच मिळाले आहे. देशाच्या उण्णतीकरता नवा काहीतरी विचार करा. युपीतील नागरिकांना जातीपातीमध्ये अडकवण्यात येत होते. युपीच्या लोकांना दरवेळी विकासाच्या राजकारणाला महत्त्व दिले आहे.

* युपीच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. जाती ही देशाला तोडण्यासाठी नाही तर देशाला जोडण्यासाठी वापरली पाहिजे. पंजाबच्या भाजपा कार्यकर्त्यांचेही आभार मोदींनी मानले आहे. देश आणि जग कोरोनाच्या सावटातून सावरत असतानाच युध्दाची गडद छाया निर्माण झाली. परंतु भारत या संकटामध्येही अढळपणे उभा आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात मागील काही दिवसांपासून युध्द सुरु झाल्याचं मोदी म्हणाले.

* देशातून एक ना एक दिवस पारिवारीक राजकारणाचा शेवट होणार मोदींचे वक्तव्य. देश आता डिजीटल होत आहे. पहिल्यांदा जनतेला हे राज्य त्यांना त्यांचं वाटत आहे असे मोदी म्हणाले. भारताच्या उज्वल भविष्यासाठी तुम्ही जे मतदान केले आहे ते खरचं कौतुकास्पद आहे.

आमचे प्रयत्न चांगले, पण परिणाम अपेक्षेप्रमाणे नाही- ओवेसी

जनतेच्या आशीर्वीदामुळेच भाजपा पुन्हा सत्तेत- योगी

* उत्तरप्रदेशातील जनतेनं विकासाला मत दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपने राज्यात अभूतपूर्व यश संपादन केले आहे. उत्तरप्रदेशातील जनतेने विकास आणि सुशासनाला आशर्वाद दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली चार राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले आहे.

* पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे. मोदींच्या नेतृत्त्वात ते शक्य आहे. विरोधकांनी मागील 2 ते 3 दिवसांत आमच्या विरोधात खोटा प्रचार केला. कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकारने प्रदेशातील जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले.

* गरीबांसाठी केलेल्या कामामुळे भाजपं सत्तेत आले आहे. जातीवाद, परिवारवादाला उत्तर प्रदेशच्या जनतेने तिलांजली दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही भयमुक्त सरकार आणणार. प्रचंड बहूमत दिल्याबद्दल योगींनी जनतेचे आभार मानले आहे. विरोधकांची बोलती जनतेने बंद केली. आम्ही पुन्हा एकदा २५ कोटी जनतेची सेवा करण्यासाठी तयार असल्याचं योगी म्हणाले.

योगी आदित्यनाथ यांचं पक्ष कार्यालयात आगमन

यूपी काँग्रेस अध्यक्ष पराभूत

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. भाजप आणि निषाद पक्ष युतीचे उमेदवार डॉ. असीम कुमार तमकुही राजमधून 67,720 मतांनी विजयी झाले. अजय लल्लू यांना 33,943 मते मिळाली. गेल्या पाच वर्षात त्यांनी खूप संघर्ष केला होता पण यावेळी त्यांना त्यांची जागा वाचवता आली नाही.

योगी आदित्यनाथ यांचा मोठा विजय

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा १ लाख २ हजार मतांनी विजय झाला आहे. ते गोरखपूरमधून निवडणूक लढवत होते. "हिंदू-मुस्लिम-शीख-इसाई सबके सब हैं भाजपायी." तुष्टीकरणाचे राजकारण, जातीच्या आधारावर राज्याचे विभाजन करणाऱ्या सर्वांना हे उत्तर आहे. 10 मार्च रोजी आम्ही 'जय श्री राम' घोषणेसह सरकार स्थापन करत आहोत...; यापेक्षा चांगले सरकार मिळू शकत नाही असे अपर्णा यादव म्हणाल्या आहेत.

अमरोहा येथे मुस्लिम समाजाने वाटली मिठाई

यूपी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबद्दल मुस्लिम समाजाच्या लोकांनी मिठाई वाटली. हे दृश्य अमरोहा येथे पाहायला मिळाले. यावेळी बुलडोझरसह ढोल-ताशे वाजवून मिठाईचे वाटप करण्यात आले.

दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होताच योगी तोडणार ४ रेकॉर्ड

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 मध्ये भाजप बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे. यूपी (UP) विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा मुख्यमंत्री म्हणून राज्याभिषेक होण्याची शक्यताही प्रबळ झाली आहे. जर ते मुख्यमंत्री झाले तर त्यांची ही दुसरी टर्म असेल आणि शपथ घेताच ते यूपीच्या राजकारणाशी संबंधित 4 रेकॉर्ड मोडतील.

लखीमपूर खेरी जिल्ह्यातील सर्व जागांवर भाजपा आघाडीवर

लखीमपूर जिल्ह्यातील 8 विधानसभा जागांवर भाजपने क्लीन स्वीप केल्याचे दिसत आहे. पालिया, मोहम्मदी, कास्ता, गोला, सदर, धौरहरा, निघासन, श्रीनगर आणि खेरी सदरमध्ये भाजपचे उमेदवार निर्णायक आघाडी घेताना दिसत आहेत.

आखिलेश यादव करहर मतदारसंघातून विजयी...

यूपीच्या संपूर्ण विधानसभा निवडणुकीत करहलमध्ये अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांचे पुत्र अखिलेश यादव येथे रिंगणात होते. अखिलेश यादव यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीच्या रिंगणात सुरुवातीला बघेल तिसऱ्या क्रमांकावर तर दुसऱ्या क्रमांकावर बहुजन समाज पक्षाचे कुलदीप नारायण होते. करहल ही जागा मैनपुरीमध्ये येते, जी मुलायम सिंह आणि समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला आहे. अखिलेश यादव यांनी स्वतःसाठी अशी विधानसभा निवडली जिथे त्यांचे वडील एके काळी शाळेत शिक्षक होते. समाजवादी पक्षासाठी ही सर्वात सुरक्षित जागा होती. भारतीय जनता पक्षानेही अखिलेश यादव यांच्या विरोधात बाजी खेळली. त्यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल यांना उभे केले होते. बघेल हे देखील या भागातील एक प्रसिद्ध नाव आहे.

पूर्वांचलमधील 61 जागांवर भाजप अन् सपा यांच्यात चुरशीची लढत

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 2022 च्या ट्रेंडमध्ये, पूर्वांचलमध्ये भाजप आणि सपा युतीमध्ये संघर्ष आहे. पूर्वांचलच्या 61 विधानसभांच्या मतदारांनी 3 मार्चला बलिया जिल्ह्यात सहाव्या टप्प्यात 7 जागांसाठी, तर वाराणसी, सोनभद्र, मऊ, गाझीपूर, आझमगढ, जौनपूर, मिर्झापूर, भदोही आणि चंदौली या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान केले होते. 54 जागांसाठी मतदान झाले.

लहान मुलांमध्येही योगी फिवर...

सपाने निवडणूक आयोगाला घेरले

मतमोजणीबाबत समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाला गोत्यात घेतले आहे. एसपीने ट्विट केले की, "गोरखपूर ग्रामीणमध्ये 1 लाख 32 हजार मतांची मोजणी झाली आहे, तर गाझीपूरमध्ये आतापर्यंत फक्त 16 हजार मतांची मोजणी झाली आहे. सपा आघाडीच्या नेतृत्वाखालील जागांची मोजणी संथ गतीने का होत आहे? याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे.

बुलडोझरसमोर काहीही टिकत नाही- हेमा मालिनी

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही सरकार स्थापन करणार हे आम्हाला आधीच माहीत होते. आम्ही विकासासाठी काम केले आहे, त्यामुळे लोकांनी विश्वास टाकला. बुलडोझरसमोर कोणीही टिकट नाही, मग ती सायकल असो की अन्य कोणीही.

हाथरस, लखीमपूरमध्ये भाजपा आघाडीवर...

यूपीतील हाथरस आणि लखीमपूर या दोन्ही जागांवर बीजेपी आघाडीवर आहे. या दोन्ही जागा खूप चर्चेत होत्या. हाथरस आणि लखीमपूरमध्ये योगी सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. हाथरसमध्ये भाजपच्या अंजुला सिंह माहूर 18 हजार मतांनी आघाडीवर आहेत. येथे सहा फेऱ्यांचे मतदान झाले आहे.

यूपीत पुन्हा कमळ फुलले, सत्तेपूर्वीच सायकल पंक्चर...

भाजप, सपाला किती टक्के मते मिळ?

आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये, यूपीमध्ये भाजपला 42% मते, समाजवादी पक्षाला 32% आणि बसपाला 13% मते मिळाली.

कानपूर पोलिसांचे फर्मान, मतमोजणीच्या दिवशी त्रास देणाऱ्यांना गोळ्या घाला

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी 10 मार्च रोजी होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. कानपूर देहाटमध्ये 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. यासोबतच मतमोजणी शांततेत पार पाडावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन तयारीत व्यस्त आहे. सततच्या गदारोळाची माहिती मिळताच एसपी स्वप्नील ममगाई यांनी मतमोजणीच्या वेळी वातावरण बिघडवणाऱ्यांना इशारा दिला. यादरम्यान, एसपींनी दृश्यावर गोळी घालण्याचे आदेश जारी केले आहेत, म्हणजे गडबड झाल्यास गोळ्या घाला.

गोरखनाथ मंदिरात उत्सव सुरू, 'योगींना पंतप्रधान बनवणार'चा जयघोष

उत्तर प्रदेश UP चुनाव निकाल 2022 च्या 403 विधानसभा जागांचे निकाल सुरू आहेत. दरम्यान, गोरखपूरमधून बातमी आहे की, सीएम योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरी मतदारसंघातून 26,000 मतांनी आघाडीवर आहेत. या जागेवर आतापर्यंत योगी आदित्यनाथ यांना 38, 633 मते, सपा उमेदवार सुभाती उपेंद्र दत्त शुक्ला 12, 357, ख्वाजा शमसुद्दीन 2, 707, काँग्रेसच्या डॉ. चेतना पांडे यांना 516 मते मिळाली आहेत. गोरखानाथ मंदिरात उत्सव सुरू झाला आहे. भाजप समर्थक योगींना पंतप्रधान करणारच अशा घोषणा देत आहेत. यासोबतच फुलांची होळीही खेळली जात आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा योगींचे सरकार स्थापन होत आहे. ट्रेंडमध्ये भाजप पुढे आहे. भाजपच्या विजयाच्या आनंदात लोक फागुआ गाताना ऐकू येत आहेत.

भाजप सोडून सपामध्ये गेलेले, दोन माजी मंत्री सतत पिछाडीवर...

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 मधील मतमोजणी सुमारे 3 तास झालं सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. 403 विधानसभा जागांसह उत्तर प्रदेशमध्ये भाजप 268, समाजवादी पक्ष 109, बहुजन समाज पक्ष 6 आणि काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशातील मतमोजणीत आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे तीन मोठे नेते आहेत, जे यूपीमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये मंत्री होते, परंतु निवडणुकीपूर्वी भाजप सोडून समाजवादी पक्षात दाखल झाले होते. परंतु, आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये या तीनपैकी दोन नेते सातत्याने पिछाडीवर आहेत. आम्ही बोलत आहोत स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान आणि धरम सिंह सैनी यांच्याबद्दल.

भाजप मोठ्या विजयाच्या दिशेने, बसपा-काँग्रेसला झटका

भाजपा उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या विजयाच्या दिशेने कुच करत आहे. योगी आदित्यानाथ सलग दुसऱ्या वेळेस बहुमतातलं सरकार बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. मतमोजणी पुर्वी सपा सत्ता स्थापनेचा दावा करत होते.

गोरखपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आघाडीवर

गोरखपूर शहरी विधानसभा मतदारसंघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आघाडीवर आहेत.

भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा ओलांडला, सुरुवातीच्या ट्रेंडनुसार 232 मतदारसंघात आघाडी घेतली.

Lucknow Election Result 2022: सपा तीन जागांवर पुढे

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमध्ये भाजप 9 पैकी 6 जागांवर पुढे आहे, तर सपा इतर 3 जागांवर पुढे आहे. लखनौ कॅंटमधून भाजपचे उमेदवार ब्रजेश पाठक, लखनौ सेंट्रलमधून भाजपचे उमेदवार रजनीश गुप्ता, लखनौ पश्चिममधून भाजपचे उमेदवार अंजनी श्रीवास्तव, बीकेटीमधून भाजपचे उमेदवार योगेश शुक्ला, लखनौ पूर्वचे भाजपचे उमेदवार आशुतोष टंडन, मलिहाबादचे भाजपचे उमेदवार जय देवी, सपाचे मोहनलाल. गंजच्या उमेदवार सुशीला सरोज, लखनौ उत्तरमधून सपा उमेदवार पूजा शुक्ला, सरोजिनी नगरमधून सपा उमेदवार अभिषेक मिश्रा आघाडीवर आहेत.

केशव प्रसाद मौर्या पिछाडीवर...

यूपीच्या फाजिलनगर विधानसभा मतदारसंघातून सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य सातत्याने पिछाडीवर आहेत.

उत्तर प्रदेशातील आताचे कल

उत्तर प्रदेशात योगी-मोदींची जादू, सपा पिछाडीवर...

उत्तरप्रदेशमध्ये मतमोजणी सुरु आहे. प्रचारादरम्यान सपाची हवा दिसत होती. आणि निवडणुकीच्या पहिल्या काही टप्प्यात सपा आघाडीवर दिसत होती. परंतु आता सुरु असलेल्या निवडणुकीच्या मतमोजणीनुसार भाजप आघाडीवर दिसत आहे.

भाजप- २२५ जागेवर आघाडीवर

सपा- ८६

बीएसपी- ४

काँग्रेस- ७

इतर- ४

उत्तर प्रदेशात भाजपची घोडदौड - २०५ जागी आघाडी

लखनौ - उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची घोडदौड सुरु आहे. सध्या हाती आलेल्या निकालांनुसार भाजपने २०५ जागी आघाडी घेतली आहे.

निकालांचे अपडेट्स

भाजप २०५

समाजवादी पक्ष १०३

बहुजन समाज पार्टी ५

काँग्रेस ४

उत्तर प्रदेश निवडणूक २०२२ लाईव्ह अपडेट्स

उत्तर प्रदेशात भाजपची १५० जागी आघाडी

लखनौ - उत्तर प्रदेशात निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली असून ४०३ जागांपैकी २४२ जागांचे कल समोर येत आहेत.

हे कल असे

भाजप १५०

समाजवादी पार्टी ८२

बहुजन समाज पार्टी ५

काँग्रेस ३

इतर २

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT