Racket Busted at Agra Paying Guest House Saam Tv News
देश विदेश

३ हजारांत तरूणीचा सौदा; द ताज पेइंग गेस्ट हाऊसमध्ये सेxxx रॅकेटचा अड्डा, 'असा' उघडा पडला आरोपींचा डाव

Racket Busted at Agra Paying Guest House: आग्रा येथील ताज पेइंग गेस्ट हाऊसमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. पोलिसांकडून धडक कारवाई.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील धांधुपुरा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नगला डीलस्थित द ताज पेइंग गेस्ट हाऊसमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून अवैध धंद्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी गेस्ट हाऊस ऑपरेटर अनिल कुमार आणि एका महिलेला अटक केली आहे. ही महिला तरूणींना देहविक्रीच्या दलदलीत ढकलत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ महिन्यांपूर्वी महुआखेडा येथील रहिवासी आरोपी अनिलने महिन्याला तीस हजार रूपये भाड्याने गेस्ट हाऊस घेतले होते. द ताज पेइंग गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसायाचा अड्डा आणि सेक्स रॅकेट सुरू होते. प्रयागराजमधील एनजीओ फ्रीडम फर्मने पोलिसांना वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती दिली. एसीपी सैंया सुकन्या शर्मा यांनी त्यांच्या पथकासह शुक्रवारी पेइंग गेस्ट हाऊसला भेट दिली.

दोन कॉन्स्टेबलला बनावट ग्राहक बनवून पाठवण्यात आले. प्रत्येकाकडून तीन हजार घेतले. त्यांना खोलीत पाठवण्यापूर्वी एसीपी सैंया सुकन्या शर्मा यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. अनिल कुमार काउंटरवर उपस्थित होते. पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली. महिलेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. तिलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पोलिसांनी अनिल आणि महिलेविरूद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, गेस्ट हाऊसमध्ये सहा खोल्या आहेत. पोलिसांनी पहिल्या खोलीची झडती घेतली. तिथून पोलिसांनी काही साहित्य जप्त केले. तर, एका खोलीत पोलिसांना तरूणी सापडली. ती १६ वर्षांची असल्याची माहिती आहे. तिला फक्त १ हजार रूपयांचे आमिष दाखवून आणण्यात आले होते. ती बेरोजगार असल्यामुळे तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saree Ironing : लॉन्ड्रीचे पैसे वाचवा, घरीच करा इस्त्री; सुरकुत्या जाऊन साडी दिसेल नव्यासारखी

Kokan Tourism: कोकणात बीच फिरून कंटाळलात? मग या ५ ऐतिहासिक किल्ल्यांना नक्की भेट द्या

Wight Loss Food: वजन कमी करायचं आहे? मग, जाणून घ्या कोणत्या पदार्थामध्ये सर्वात जास्त फायबर असतात

Sayali Sanjeev: तुला पाहून मन वेडं झालं...

मोठी बातमी! नंदूरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदाराला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT