Uttar Pradesh Balarampur Leopard Attack  Saam Tv
देश विदेश

Leopard Attack : जंगलात शौचालयाला गेलेल्या तरुणीवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला, दबक्या पावलाने आला अन्...

Uttar Pradesh Balarampur Leopard Attack News : जंगलात शौचासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणीवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. घटनास्थळी गावकरी धावले तरी उशीर झाला आणि तरुणीचा मृत्यू झाला.

Alisha Khedekar

  • उत्तर प्रदेशात बिबट्याचा प्राणघातक हल्ला

  • जंगलात शौचासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणीवर हल्ला

  • हल्ल्यात तरुणीचा मृत्यू

  • वन विभागाचे सतर्कतेचे आवाहन

महाराष्ट्रात बिबट्याची दहशत असतानाच आता उत्तर प्रदेशात देखील बिबट्याची दहशत पाहायला मिळाली आहे. जंगलात शौचालयाला गेलेल्या तरुणीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्या दरम्यान तरुणी जीव वाचवण्यासाठी मोठं मोठ्याने ओरडत होती, मात्र गावकरी घटनास्थळी पोहचेपर्यंत तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेने उत्तर प्रदेशातील बलरामपूरच्या भानबर रेंजमध्ये नेपाळ सीमेला लागून असलेल्या बिशनपूर कोडेर गावात नागरिक भयभीत झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पीडित २५ वर्षीय तरुणी तिच्या घरापासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या जंगलात शौचालयासाठी गेली होती. यादरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दबक्या पावलाने जाऊन तरुणीवर हल्ला केला. तरुणी घाबरलेल्या आणि जखमी अवस्थेत मदतीसाठी याचना करत होती.

बिबट्याने तरुणीच्या गळ्यावर थेट वार केला होता. गावकऱ्यांनी किंचाळण्याचा आवाज ऐकताच घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत उशीर झाला होता. तरुणीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे घटनास्थळी पोहचताच त्यांना तरुणीच्या मानेवर हल्ला केल्याच्या खुणा आढळल्या.

शिवाय तरुणीच्या मानेतून रक्तस्त्राव होत होता. या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मृत तरुणीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वन परिक्षेत्र अधिकारी योगेश कुमार म्हणाले की, वन विभागाच्या पथकाने लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गावकऱ्यांना जंगलात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले आहेत. बाधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये शिवसेना ठाकरे पदाधिकाऱ्यांचा राडा!

Girija Oak: अभिनेत्री गिरीजा ओक कुठे राहते?

पुण्यातील उच्चशिक्षित जोडपं लव्ह मॅरेजनंतर २४ तासांच्या आत झालं वेगळं; कारण फक्त एवढंच

Shocking : "मराठी सोडून हिंदीत बोलते..." ६ वर्षांच्या लेकीची निर्घृण हत्या; निर्दयी आईनेच रचला कट

Skin Care : 'या' गोष्टी वापरुन करा फेस स्क्रब, सगळे ब्लॅकहेड्स निघून जातील

SCROLL FOR NEXT