Times Square Firing Saam tv
देश विदेश

Times Square Firing: भर दिवसा गोळीबाराचा थरार; मोठ्या आवाजाने रस्त्यावर नागरिकांची धावाधाव, अमेरिका हादरली

Times Square Firing: न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. गोळीबारानंतर लोकांनी सुरक्षिततेसाठी धावाधाव केली असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Shruti Vilas Kadam

Times Square Firing: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली. गर्दीच्या ठिकाणी अचानक गोळ्या झाडल्या गेल्याने नागरिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

न्यूयॉर्क पोलीस विभागाच्या (NYPD) माहितीनुसार, ही घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे ३:४० वाजण्याच्या सुमारास घडली. गोळीबारानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

न्यूयॉर्क अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेल्या एका व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. घटनेच्या वेळी परिसरात मोठी गर्दी होती. 'न्यूयॉर्क निक्स' संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हजारो लोक लोअर मॅनहॅटनच्या रस्त्यांवर जमले होते. या उत्सवासाठी प्रशासनाने सुमारे १० हजार पोलीस अधिकारी तैनात केले होते. तरीही गर्दीच्या वातावरणात अचानक झालेल्या गोळीबारामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकू येताच लोक घाबरून इकडे-तिकडे पळताना दिसत आहेत. अनेकांनी जवळच्या इमारती, दुकाने आणि सुरक्षित ठिकाणांचा आश्रय घेतला. विशेष म्हणजे, हा गोळीबार एका पोलीस वाहनापासून अवघ्या काही मीटर अंतरावर झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, टाइम्स स्क्वेअरमध्ये अशा प्रकारची ही पहिली घटना नाही. याआधी १६ जून रोजीदेखील याच परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. त्यावेळी 'न्यूयॉर्क निक्स'च्या ऐतिहासिक विजयाच्या उत्सवादरम्यान गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी देखील तिथे जमलेल्या व्यक्तींनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, त्यावेळीही पोलिसांनी त्यावेळी एका व्यक्तीकडून भरलेले बंदूक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात खळबळ! सत्ताधारी आमदाराच्या भावाने तरुणाला भररस्त्यात झोडपले; घटना CCTV मध्ये कैद

डायबिटीजच्या रुग्णांनी दुधात 'हा' पदार्थ मिसळून प्या, रक्तातील साखर वाढणार नाही

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर गळती

भाजप नेत्याकडून सासऱ्यांची चाकूने सपासप वार करून हत्या; पत्नीने माहेरी जाण्यास नकार दिल्याने उचलले भयानक पाऊल

Mumbai Pune Trains: पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! सलग ७ दिवस 'या' ३० गाड्या धावणार नाहीत; रेल्वेने सांगितलं मोठं कारण

SCROLL FOR NEXT