वॉशिंग्टन : ९ मार्च २०२२ ला एक भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानात जाऊन पडलं होतं यावरुन पाकिस्तानात खळबळ माजली होती. भारताने पाकिस्तानी हवाई क्षेत्राचं उल्लंघन केलं असा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला होता. याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी ही घटना अपघाचाने झाल्याची माहिती संसदेत दिली आहे.
मात्र, आता या प्रकरणावर पाकिस्तानने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनाशी संवाद साधताना भारतीय "सुपरसॉनिक प्रोजेक्टाइल्स" त्यांच्या हवाई क्षेत्रात कोणत्याही कारणाशिवाय प्रवेश केल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशीही सुरू आहे. आता या मिसाईल प्रकरणात अमेरिकेनेही भारताची बाजू घेतली आहे.
हे देखील पहा -
भारताच्या बाजूने पाकिस्तानमध्ये पडलेलं मिसाईल हे केवळ अपघाताने पडलं असून याबाबतीत दुसरं कोणतंही कारण नसल्याचे अमेरिकेने (America) म्हटलं आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ता नेड प्राइस (US State Department spokesman Ned Price) यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, "जे तुम्ही भारतीय सहकाऱ्यांकडून ऐकले आहे की, ही घटना एक चुक होती बाकी काही नाही, आम्हाला देखील त्यामागे कोणतेही कारण दिसत नसल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, 9 मार्च 2022 ला घडलेल्या एका घटना क्षेपणास्त्राच्या तपासणी आणि देखभालीदरम्यान अपघाताने क्षेपणास्त्र सोडण्याशी संबंधित आहे. 9 मार्च 2022 ला संध्याकाळी 7 वाजता, एक मिसाईल चुकून लॉन्च झाली जी पाकिस्तानमधील एका भागात पडली, ही घटना खेदजनक आहे. मात्र, यामध्ये कोणतेही नुकसान झाले नाही ही आनंदाची बातमी असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.