US government shutdown 2025 impact on employees : जगाला हादरवणाऱ्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पयांना अमेरिकेत जोरदार धक्का बसला आहे. सिनेट फंडिंग बिल पास करण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे अमेरिकेत मध्यरात्रीपासून शटडाऊन लागू झालेय. त्यामुळे सर्व सरकारी कामे ठप्प झाली आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावरही संकट ओढावलेय. कारण, सरकारकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी आणि खर्च करण्यासाठी पैसा नसेल.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना सिनेटमध्ये फंडिंग बिल पास करता आले नाही. मंगळवारी रात्री उशिरा या बिलावर मतदान झाले. बिलाच्या समर्थनात ५५ मते पडली, तर विरोधात ४५ मते पडले. हे बिल पास करण्यासाठी ६० मतांची गरज होती. ट्रम्प यांच्या बाजूने ५ मते कमी पडली. त्यामुळे अमेरिका मध्यरात्रीपासून ठप्प होतेय. २०१९ नंतर पहिल्यांदाच सरकारी शटडाऊन झालेय.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीला विरोधी पक्ष डेमोक्रेट्सच्या खासदारांचे समर्थन हवं होतं. पण डेमोक्रेट्सने बिलाच्या विरोधात मतदान केले. १०० सदस्यांच्या सिनेटमध्ये ५३ रिपब्लिकन, ४७ डेमोक्रेट आणि २ अपक्ष कासदार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना बिल मंजूर करण्यासाठी समर्थन मिळवण्यात अपयश आले. फक्त अपक्ष खासदारांनीच ट्रम्प यांना साध दिली. विरोधातील एकही मत फुटले नाही. त्यामुळे अमेरिकेत मध्यरात्रीपासून शटडाऊन सुरू झालेय.
अमेरिकेत सरकारला प्रत्येक वर्षी आपलं बजेट मंजूर करावं लागतं. जर खासदारांनी सहमती दर्शवली नाही, तर फंडिंग बिल पास होत नाही. त्यामुळे सरकारला मिळणारा पैशाला स्थगिती मिळते. असं झाल्यास सरकारी कार्यालयात आणि इतर कामांसाठी पैसे उपलब्ध राहत नाहीत. काही सेवा बंद कराव्या लागतात. त्यालाच सरकारी शटडाऊन म्हटले जाते.
डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष आज पु्न्हा सिनेटमध्ये फंडिंग बिलावर मतदान घेण्याच्या तयारीत आहे. जोपर्यंत बहुमत मिळणार नाही, तोपर्यंत दररोज हे बिल मांडलं जाईल, असे ट्रम्प यांच्या एका खासदाराने सांगितले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी या शटडाऊनला डेमोक्रेट्सला जबाबदार धरलेय. ट्रम्प यांनी याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. जवळपास ९ लाख कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.