Joe Biden 
देश विदेश

Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेनवर ओढवलं संकट? बेकायदेशीरीत्या बंदूक खरेदी प्रकरणात मुलगा हंटर दोषी

Joe Biden: ऑक्टोबर 2018 मध्ये हंटर बायडेनवर कोल्ट कोब्रा हँडगन खरेदी केल्याचा आरोप होता, परंतु त्याबाबत योग्य माहिती दिली नाही. आरोप झाले तेव्हा त्याला अंमली पदार्थांचे व्यसन होते.

Bharat Jadhav

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन याला बेकायदेशीरपणे बंदूक खरेदी केल्याबद्दल न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अंमली पदार्थांच्या सेवन केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरविण्यात आले आहे. हंटर बायडेनवर ज्यावेळी बेकायदेशीर बंदूक खरेदी केली होती, त्यावेळी त्या अंमली पदार्थांचे व्यसन होते. अंमली पदार्थांचे व्यसन असल्याची माहिती त्याने लपवली होती, त्याप्रकरणातही हंटरला दोषी ठरवण्यात आले आहे.

ऑक्टोबर २०१८ मध्ये हंटर बायडेनवर कोल्ट कोब्रा हँडगन खरेदी केल्याचा आरोप होता, परंतु त्याबाबत त्याने योग्य माहिती दिली नाही. त्यादरम्यान त्याला अंमली पदार्थांचे व्यसन होते. तो नियमितपणे अंमली पदार्थांचे सेवन करत होता, असा आरोपही हंटर करण्यात आलाय

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत असा कायदा आहे की ड्रग्ज सेवन करणाऱ्या व्यक्तीकडे बंदूक किंवा कोणतेही प्राणघातक शस्त्र बाळगता परवानगी नाहीये. हंटर बायडेन हा अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष बायडेनचे पुत्र आहेत. दरम्यान एखाद्या राष्ट्राध्यक्षांच्या पुत्रावर असे एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात येण्याची घटना पहिल्यांदा घडलीय.

दरम्यान न्यायालयाच्या ज्युरीचा हा निर्णय अशा वेळी आलाय जेव्हा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्याय व्यवस्थेवर आपल्या विरोधात शस्त्र वापरल्याचा आरोप केला होता. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गुप्तपणे पैसे देण्याप्रकरणी आणि रेकॉर्डमध्ये हेराफेरी केल्याच्या ३४ गुन्ह्यांमध्ये ट्रम्प दोषी आढळलेत. यासह गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलेले ते अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: मैत्री, भेटायला बोलवलं अन् अत्याचार; १५ वर्षीय मुलीबरोबर खोलीत 'नको ते घडलं'; परिसरात खळबळ

Pune : सराव बंद करा म्हणून धमकावत पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण; पुण्याच्या तळजाई टेकडी परिसरातील घटना

SIDBI Recruitment: SIDBI मध्ये नोकरीची संधी, पगार मिळणार १,१५,००० रुपये; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Tesla Model Y: दमदार फिचर्ससह टेस्ला भारतात लाँच; किंमत किती?

Shivani Mundhekar : 'ऊन ऊन व्हटातून ...' शिवानीचं सौंदर्य पाहून सैराट व्हाल

SCROLL FOR NEXT