G20 Konark Wheel: ‘कोणार्क चक्र’ काय आहे? जो बायडेन यांना मोदींनी दिली सविस्तर माहिती

What Is Konark Wheel: मोदींनी विविध देशांतून आलेल्या राष्ट्रप्रमुखांचे भारत मंडपात स्वागत केलेय.
G20 Konark Wheel
G20 Konark WheelSaam TV

G20 Summit Delhi 2023:

जी २० शिखर परिषदेचं अध्यक्षपद यंदा भारताकडे आहे. या परिषदेसाठी जगभरातील देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीत दाखल झालेत. दिल्लीच्या प्रगती मैदानमधील "भारत मंडप"मध्ये या परिषदेचं अयोजन करण्यात आलंय. ९ आणि १० सप्टेंबर असे दोन दिवस जी २० शिखर परिषद सुरू राहणार आहे. मोदींनी विविध देशांतून आलेल्या राष्ट्रप्रमुखांचे भारत मंडपात स्वागत केलेय. सध्या मोदी आणि बायडेन यांच्यातील एक संवाद समोर आला आहे. (Latest Marathi News)

मोदी आणि बायडेन यांच्यातला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारत मंडपात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचेही स्वागत केले. भारत मंडपच्या मागच्या दिशेला कोणार्क चक्र आहे. यावेळी मोदींनी बायडेन यांचा हात धरत त्यांना कोणार्क चक्राजवळ आणले. तसेच हे चक्र काय आहे? त्याच्या मगचा इतिहास काय याबाबत माहिती दिली. ही माहिती घेतल्यावर बायडेन आणि मोदी दोघेही सभागृहात गेले.

G20 Konark Wheel
Nanded Crime News: खळबळजनक! ५० लाखांची खंडणी न दिल्याने परभणीतील बालकाची नांदेडमध्ये हत्या; दोरीने हातपाय बांधले अन्...

कोणार्क चक्राचा इतिहास काय?

कोणार्क चक्राचा एक मोठा इतिहास आहे. भारत मंडपमध्ये सर्वत्र भारताची संस्कृती, कला, इतिहास सांगणारी शिल्प उभारण्यात आलेत. ओडिशामधील कोणार्क मंदिरात कोणार्क चक्राची उभारणी आहे. कोणार्क चक्र राजा नरसिंहदेव १ च्या कारकिर्दीत १३ व्या शतकात बांधण्यात आलं आहे.

कोणार्क चक्र शक्तिशाली चक्राचे प्रतिक आहे. येथे गती, वेळ, कालचक्र सतत बदलत असल्याचे दिसते. कोणार्क चक्रमध्ये काही वर्तुळे आणि आऱ्या आहेत. या आऱ्या आणि वर्तुळांची संख्या २४ आहे. कोणार्क चक्राला काळाचं प्रतिक म्हणजेच कालचक्र म्हणून देखील ओळखलं जातं.

G20 Konark Wheel
India Name Change: 'भारत माता की जय'; G-20 निमंत्रण पत्रिकेवरील वादावर एकनाथ शिंदे यांचं ट्विट, म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com