America News Saam Tv
देश विदेश

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा तरुणाला मोठा फटका; एच १ बी व्हिसा नियम बदलताच लग्न मोडलं

America News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B हा नवा निर्णय लागू केला आहे. या निर्णयामुळे एका भारतीय तरुणाचं लग्न मोडलं आहे.

Alisha Khedekar

  • ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय

  • H-1B व्हिसासाठी वार्षिक ८८ लाख शुल्क अनिवार्य.

  • भारतीय आयटी कंपन्या आणि तीन लाख भारतीय कामगार अडचणीत.

  • ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, जेपी मॉर्गनने कर्मचाऱ्यांना २१ सप्टेंबरपर्यंत अमेरिकेत परतण्याचे आदेश.

  • एका भारतीयाचे लग्न व्हिसा शुल्कवाढीमुळे मोडले

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना अडचणीत आणणणारा ठरला आहे. भारतीयांकडून मागणी असलेल्या एच-१ बी व्हिसासाठी आता १ लाख डॉलर्स म्हणजेच साधारण ८८ लाख रुपये इतकं वार्षिक शुल्क आकारण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. यामुळे तीन लाख भारतीयांना शुल्कवाढीचा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे एका भारतीय तरुणाचं लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा धोरणात मोठा बदल केला असून यापुढे एच १बी या व्हिसासाठी अमेरिकन कंपन्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी प्रतिवर्षी १ लाख डॉलर म्हणजेच ८८ लाख रुपये भरण्याची तरतूद केली आहे. या निर्णयाचा फटका आयटी क्षेत्रातील कंपन्यांना बसणार असल्याचे बोलले जाते. या व्हिसाचा फायदा भारतीय नागरिकांनी अधिक घेतल्याची आकडेवारी समोर आलेली आहे. या निर्णयानंतर आता मायक्रोसॉफ्ट, जेपी मॉरगन आणि ॲमेझॉन सारख्या कंपन्यांनी एच-१बी व्हिसाधारक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ॲमेझॉन कंपनीने सर्व एच-१बी आणि एच-४ व्हिसाधारक कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला आहे. ईमेलमध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांना २१ सप्टेंबरच्या आत अमेरिकेत परतण्यास सांगितले आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने लागू केलेल्या नियमाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. एच-४ व्हिसाधारक हे एच-१बी व्हिसा धारकांचे कायदेशीर पती-पत्नी आणि अविवाहित मुले आहेत.

या ईमेलनंतर एका भारतीयाला त्वरित कामावर रुजू होण्यासाठी अमिरिकेत जावं लागल्याने त्याचं ठरलेलं लग्न मोडलं आहे. या घटनेने त्याने ट्रम्प प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय बेजबाबदार आणि अत्यंत दुर्दैवी आहे अशी टीका अमेरिकेतल्या सिनेट सदस्यांपैकी काहींनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

SCROLL FOR NEXT