US Cargo Plane Crash : अमेरिकेतील कार्गो विमानाचा भयानक अपघात झाला आहे. केंटकी येथील लुईसव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेताच कार्गो विमान एका क्षणात आगीच्या गोळ्यात रूपांतर झाले अन् जमिनीवर कोसळले. यूपीएस एअरलाइन्सचे हे मालवाहू विमान होते, उड्डाण घेताना त्यात आग लागली अन् मोठी दुर्घटना घडली. याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या विमान अपघातामध्ये आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर ११ जण जखमी आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे समजतेय. अपघातानंतर तातडीने मदतकार्य घटनास्थळावर दाखल झाले. पण तोपर्यंत विमानातून आगीचे लोट अन् काळाकुट्ट धूर निघत होता. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. केंटकीचे गव्हर्नर अँडी बेशियर यांनी सुरुवातीला तीन जणांचा मृत्यू आणि ११ जण जखमी झाल्याची माहिती दिली होती, परंतु नंतर मृतांची संख्या चार झाली. अपघातस्थळापासून सुमारे पाच ते ८ किमी अंतरावरूनही धुराचे दाट ढग दिसत होते. या दुर्घटनेनंतर अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली.
कार्गो विमान उड्डाण करत असताना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५:१५ वाजता दुर्घटना घडली. अचानक विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात आग लागली. विमानातील ४ जणांचा मृत्यू झालाय. विमानाला लागलेली आग इतकी तीव्र होती की त्यामुळे संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले. महापौर क्रेग ग्रीनबर्ग यांच्या मते, विमानात अंदाजे २,८०,००० गॅलन इंधन होते आणि त्यामुळे ही अनेक प्रकारे चिंतेची बाब आहे. इंधनामुळे आग झपाट्याने पसरली. दुर्घटनेत ११ जण गंभीर जखमी आहेत. त्यांची प्रकृती पाहाता मृताची संख्या आणखी वाढू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.