US Shooting
US Shooting Saam Tv
देश विदेश

US Shooting: अमेरिका पुन्हा हादरली! विद्यापीठाजवळ अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

Shivani Tichkule

America Gun Firing: अमेरिकेत गोळीबाराच्या घटना काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरली आहे. अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतातील रिचमंड येथील व्हर्जिनिया कॉमनवेल्थ विद्यापीठाजवळ गोळीबाराची घटना घडली.

या गोळीबाराच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Latest Marathi News)

हायस्कूलमधील कार्यक्रमानंतर तिथे गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराच्या घटनेनेत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबारानंतर दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती रिचमंडचे पोलीस प्रमुख रिक एडवर्ड्स यांनी दिली आहे. (America News)

ज्या ठिकाणी पदवीदान कार्यक्रम सुरू होता, तेथील अधिकाऱ्यांना स्थानिक वेळे सायंकाळी साडेपाच वाजता गोळीबाराचा आवाज ऐकू आला. यानंतर पोलिसांना (Police) या घटनेची माहिती देण्यात आली.

रिचमंड पब्लिक स्कूलने आपल्या वेबसाईटवर या घटनेचा उल्लेख केला आहे. थिएटरच्या पलीकडे असलेल्या मोनरो पार्कमध्ये गोळीबार झाला. कॉलेज कॅम्पसला लागून असलेल्या हायस्कूलच्या पदवीदान समारंभानंतर ही घटना घडली. विद्यार्थी आणि इतर उपस्थित लोक थिएटरमधून बाहेर पडत असताना त्यांना सलग 20 गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आला होता. या गोळीबाराच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, सुनील तटकरेच्या कार्यकर्त्यांना सूचना

Coffee पिणं आरोग्यासाठी गुणकारी?

Mumbai News: PM मोदींचे शिवाजी पार्क परिसरातील कटआऊट्स हटवले, निवडणूक आयोगाची कारवाई

Pimpri-Chinchwad Hoarding Collapsed : पिंपरी-चिंचवड शहरात कोसळलं भलं मोठं होर्डिंग; दुचाकींसह वाहनं दबल्याची भीती, पाहा Video

Shahada News : शहाद्यात महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास

SCROLL FOR NEXT