मध्य पूर्वेत युद्धाचा ज्वालामुखी आता फुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. कारण, अमेरिकेनं इराणच्या उंबरठ्यावर आपला सर्वात घातक लष्करी ताफा तैनात केलाय. अमेरिकन नेव्हीच्या विनाशकारी युद्धनौका आणि आकाशातून मृत्यू ओकणारी F-35 स्टील्थ फायटर जेट्स इराणच्या अगदी जवळ पोहोचवलीयत. इराण बेचिराख होणार का? हे तिसऱ्या महायुद्धाचं पहिलं पाऊल आहे का? पाहा एक स्पेशल रिपोर्ट
इराणच्या सीमेवर सुरू असलेल्या हालचालींवरून संपूर्ण जगाची धडधड वाढलीय. अमेरिकेनं आपलं सर्वात शक्तिशाली नौदल आणि हवाई दल 'हाय अलर्ट'वर ठेवलंय. इराणच्या रडारलाही गुंगारा देणारी F-35 सारखी 'स्टील्थ' विमानं आता इराणच्या आकाशात घोंगावतायत.
इराणमध्ये आधीच अस्थिर असताना अमेरिकेनं इराणची नाकेबंदी केलीय. हे केवळ 'प्रेशर पॉलिटिक्स' आहे की मोठ्या एअर स्ट्राईकची पूर्वतयारी? या प्रश्नानं जगाची झोप उडवलीय. मात्र इराणनंही अमेरिकेला खुलं चॅलेंज दिलंय. पहिली गोळी अमेरिकेनं झाडली तर त्यांचं लष्करी तळ बेचिराख करण्याची गर्जना इराणच्या लष्करी प्रमुखांनी केलीय. इराणनं प्रतिहल्ला केल्यास संपूर्ण मध्य पूर्व जळून खाक होईल.
याचा थेट फटका कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला बसेल आणि भारतासारख्या देशांची सुरक्षा धोक्यात येईल. आता हा केवळ दोन देशांचा वाद राहिलेला नाही. तर ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी आहे. वेळीच शांतता प्रस्थापित झाली नाही, तर इतिहासातील हा सर्वात मोठा विनाश ठरू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.