Pilot arrested after landing plane on highway Saam TV
देश विदेश

मद्यधुंद पायलटने हायवेवर विमान उतरवलं! पोलिसांना सांगितलं अजब कारण

Pilot arrested after landing plane on highway : उड्डाण करण्याआधी विमानातील इंधनाची नीट तपासणी केली जाते, असं असताना इंधन कमी असल्याचं पायलटच्या आधीच लक्षात आलं नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मिसुरी, अमेरिका: दारू पिऊन (Drunk) वाहन चालवणे नेहमीच धोक्याचं असतं. दारू किंवा इतर कोणत्याही अंमली पदार्थांचे सेवन करुन वाहन चालवणं जवळपास सगळ्याच देशांमध्ये बेकायदेशीर आहे. असं असताना एका पायलटने (Pilot) दारू पिऊन विमान उडवलं, एवढंच नाही तर ते विमान त्याने चक्क हायवेवर उतरवलं, ज्या ठिकाणी नेहमीप्रमाणेच वाहनांची वर्दळ होती. मात्र, सुदैवाने यावेळी कोणताही अपघात घडला नाही किंवा कुणीही जखमी झालं नाही. ही घटना अमेरिकेतील मिसुरी राज्यातील असून पोलिसांनी पायलटला ताब्यात घेतलं आहे. (US Pilot Plane Landing On Highway)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतल्या एका 35 वर्षीय पायलटने आपले विमान चक्क महामार्गावर उतरवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता तो पायलट चक्क दारूच्या नशेत होता आणि त्याच्याकडे अमली पदार्थ आढळून आले. विमानाचं इमर्जेन्सी लॅण्डींग करण्यापूर्वी त्याने इंधन संपल्याची सूचना रेडिओवर दिली होती. शुक्रवारी या वैमानिकाला त्याचे विमान महामार्गावर उतरवल्यानंतर अटक करण्यात आली. त्यानंतर त्याने माझ्या विमानातलं फ्यूल (Fuel) संपलं असं अजब कारण दिलं आहे. उड्डाण करण्याआधी विमानातील इंधनाची नीट तपासणी केली जाते, असं असताना इंधन कमी असल्याचं पायलटच्या आधीच लक्षात आलं नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.

हा पायलट फ्लोरिडाहून मिसूरीला गेला होता आणि तो कॅन्सस सिटीच्या चार्ल्स बी. व्हीलर डाउनटाउन विमानतळावर उतरणार होता. फ्लोरिडाहून जाताना, पायलटने टेनेसी राज्यात एक थांबा केला आणि नंतर वॉरन्सबर्ग, मिसूरी येथे आणखी एक थांबा केला. वॉरन्सबर्ग येथून उड्डाण केल्यानंतर १९ मिनिटांनी वैमानिकाने अधिकाऱ्यांना फोन केला.

मिसुरी राज्यात पहाटे २:३० वाजता (सकाळी ७:३० UTC) इमर्जन्सी लँडिंग करण्यापूर्वी त्याच्याकडे इंधन संपले असल्याची सूचना देण्यासाठी त्याने विमान वाहतूक अधिकाऱ्यांना रेडिओ संदेश पाठवला होता. मिसूरी स्टेट हायवे पेट्रोलने सांगितले की, विमानाची लँडिंगच्या वेळी रेलिंगशी छोटी टक्कर झाली, परंतु कोणत्याही कार किंवा इतर मालमत्तेचं नुकसान झालेलं नाही.

विमान हायवेवर उतरले तेव्हा विमानात पायलट हा एकमेव व्यक्ती होता. त्याला किरकोळ दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार हा ३५ वर्षीय पायलट मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे त्याच्यावर निष्काळजीपणाने विमान चालवल्याच्या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच अपघात करणे, अंमली पदार्थ बाळगणे, बंदुक बाळगणे, मादक द्रव्यांचा बेकायदेशीर वापर असे अनेक आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन आता स्थानिक अधिकाऱ्यांना घटनेच्या तपासात मदत करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT