Inside the Venezuela Strike How the US Planned a Massive Military Operation Saam Tv
देश विदेश

व्हेनेझुएलावरील हल्ल्यामागे तेलाचं राजकारण, ड्रग्जच्या नावाखाली अमेरिकेचा तेलावर डोळा?

Inside the Venezuela Strike: अमेरीकेने व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर त्याचे जगभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. निर्वासितांचे लोंढे आणि ड्रग्ज तस्करीमुळे ही कारवाई केल्याचा अमेरिकेनं दावा केला असला तरी यामागे दुसरंच कारण असल्याची चर्चा आहे...ते नेमकं काय आहे? अमेरिकेचा नेमका कशावर डोळा आहे?

Girish Nikam

रशिया-युक्रेन, भारत-पाकिस्तान, इस्त्राईल-इराण या देशांमधील युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थाच्या भूमिकेत असणा-या अमेरिकेनेच आपल्या शेजारील राष्ट्रावर मोठा हल्ला केलाय. दक्षिण अमेरीकेतील व्हेनेझुएलावर हल्ला करुन राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक केली आहे. अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या कारवाईने जगभरात खळबळ उडाली आहे.

रशिया, चीन, उत्तर कोरीया या देशांनी यावर तिखट प्रतिक्रीया देऊन अमेरिकेवर टीका केली आहे. पण खरंच हल्ला करण्याइतका व्हेनेझुएला अमेरीकेसाठी डोकेदुखी बनला होता का? की या हल्ल्यामागे अमेरीकेचा काही स्वार्थ दडला आहे? ते पाहूया

ड्रग्जच्या नावाखाली तेलासाठी हल्ला?

व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वांत मोठा तेलसाठा आहे. 2023 पर्यंत अंदाजे 303 अब्ज बॅरल तेलाचे ज्ञात साठे आहेत. हे प्रमाण अमेरिकेच्या तेलसाठ्याच्या पाचपट जास्त आहे. दुसरं कारण निर्वासितांचं आहे. राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या अन्यायकारक धोरणांमुळे त्या देशातील लाखो रहिवासी अमेरिकेत आले आहेत. मादुरो यांनी गुन्हेगार आणि रुग्णांना जाणीवपूर्वक अमेरिकेत जाण्यास भाग पाडले असा अमेरिकेचा आरोप आहे. आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे व्हेनेझुएलामार्गे अमेरिकेत कोकेन आणि फेंटानिलसारख्या अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. त्यामुळे अमेरीकेची युवा पिढी व्यसनाधीन झाल्याचा दावा अमेरिकेनं केलाय.

व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था पूर्णपणे तेलावर अवलंबून आहे. हा देश दररोज सुमारे नऊ लाख बॅरल तेल निर्यात करतो. चीन हा व्हेनेझुएलाचा सर्वांत मोठा तेल खरेदीदार आहे. व्हेनेझुएलात सुरूवातीपासूनच डाव्यांची सत्ता राहिलीय. दिवंगत ह्युगो चावेझ यांच्या निधनानंतर कट्टर डावे असलेल्या निकोलस मादुरो यांनीही अमेरिकेचा कट्टर विरोध कायम ठेवला आणि व्हेनेझुएलाच्या सत्तेवर पकड मिळवली.

अमेरिकाविरोधी मादुरो यांची कारकिर्द

कामगार संघटनेच्या नेत्याचा मुलगा असलेल्या निकोलस मादुरो बस ड्रायव्हर होते. 1992 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. मादुरो हे नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष आणि नंतर परराष्ट्र मंत्रीही झाले. परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी व्हेनेझुएलाचा तेल व्यवसाय जगभर वाढवला. दिवंगत राष्ट्राध्यक्ष चावेझ यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी मादुरोला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून निवडले. 2013 मध्ये चावेझ यांचे निधन झाल्यानंतर मादुरो यांनी निवडणूक जिंकली आणि व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष झाले.

अमेरिकेने मादुरो यांना अटक केल्यानंतर व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांना अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मादुरो यांनी एक निवेदन जारी करून बदला घेण्याचा निर्धार व्यक्त केलाय आणि देशभरात आणीबाणीची घोषणा केली. अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेल आणि खनिजांवर ताबा मिळवण्यासाठी सत्तापालट करत असल्याचा आरोप मादुरोंनी केलाय.

मादुरो यांनी त्यांचे विधान जारी केल्यानंतर अवघ्या एका तासात ट्रम्प यांनी त्यांच्या अटकेची घोषणा केली. मादुरोंच्या अटकेनंतर तरी महागाई उसळलेल्या व्हेनेझुएलामध्ये काही बदल होणार का ? ते पाहणं महत्वाचं आहे. आधीच संपूर्ण जग तिस-या युद्धाच्या छायेखाली आहे. अमेरीकेच्या या कृतीचे दुरगामी काय परीणाम होतात ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2026: मुंबईत मनसेला भगदाड, भाजपनंतर शिवसेनेकडून धक्का, शेकडो पदाधिकारी शिंदेसेनेत

Destination Wedding Places : डेस्टिनेशन वेडिंग प्लान करताय? ही आहेत भन्नाट लोकेशन्स

Film Director Death: प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Irrfan Khan Birth Anniversary : इरफान खानने वाचवला होता जीव; आज 'तो' आहे IPS ऑफिसर, नेमका किस्सा काय?

Hairstyle Ideas: मकर संक्रांतीला काळ्या साडीवर खुलून दिसतील 'या' 5 हेअरस्टाईल्स; पारंपारिक लूकला मिळेल मॉडर्न टच

SCROLL FOR NEXT