युपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या निकालाबाबतचं मोठं वृत्त हाती आलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा २०२३ चा निकाल आज शुक्रवारी निकाल जाहीर करण्यात आला आहे. युपीएसीसीच्या साईटवर जाऊन उमेदवारांना निकाल पाहता येणार आहे. यंदा १५ ते २४ सप्टेंबर या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती. (Latest Marathi News)
युपीएससीनं २८ उमेदवारांचा निकाल कोर्टानं प्रलंबित प्रकरणाणुळे राखून ठेवला होता. मात्र, आज शुक्रवारी निकाल जाहीर करण्यात आला आहे. तसेच परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे अंतिम निकाल १५ दिवसांच्या आत वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड केले जाणार आहे. आयोगाने जाहीर केलेले निकाल ३० दिवस वेबसाईटवर उपलब्ध राहतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. युपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जा
२ . होमपेजवरील रिझल्ट या लिंक वर जाऊन क्लिक करा.
३. पीडीएफच्या स्वरुपात एक नवीन पेज उघडलं जाईल.
४. पीडीएफ डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआऊट घ्या. या पीडीएफमध्ये ज्या उमेदवारांचे नंबर असतील, ते IAS, IFS, IPS आणि इतर केंद्रीय सेवा (गट अ आणि गट ब) यांची वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र झालेले असतील.
वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरलेले उमेदवारांना डिटेल फॉर्म -२ (DAF-II) अनिवार्य भरावा लागणार आहे. त्यानंतर जमा करावा लागणार आहे. पुढे ९ डिसेंबर ते १६ डिसेंबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे.
या उमेदवारांची मुलाखतीची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. याचबरोबर ही मुलाखत लोकसेवा आयोगाचं कार्यालय, धोलपूर हाऊस, शहाजहाँ रोड, नवी दिल्ली - ११००६९ इथं पार पडतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.