Yogi Adityanath
Yogi Adityanath  SaamTvNews
देश विदेश

UP : दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनून योगी मोडणार 'हे' चार रेकॉर्ड

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Uttar Pradesh Election Result 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 मध्ये भाजप बहुमताकडे वाटचाल करताना दिसत आहे. यूपी (UP) विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा मुख्यमंत्री म्हणून राज्याभिषेक होण्याची शक्यताही प्रबळ झाली आहे. जर ते मुख्यमंत्री झाले तर त्यांची ही दुसरी टर्म असेल आणि शपथ घेताच ते यूपीच्या राजकारणाशी संबंधित 4 रेकॉर्ड मोडतील.

चला जाणून घेऊया योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होताच कोणते 4 रेकॉर्ड मोडणार आहेत.

योगी आदित्यनाथ संपवणार 'नोएडा' बद्दलचे मिथक

नोएडा (Noida) हे उत्तर प्रदेशच्या (UP) राजकारणातील एक मिथक आहे. ज्या अंतर्गत असे मानले जाते की जो मुख्यमंत्री नोएडाच्या दौऱ्यावर येतो, तो पुढच्या वेळी मुख्यमंत्री बनतच नाही. हा समज अथवा मिथक काँग्रेसचे (Congress) माजी मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह यांच्या काळापासून बनवला गेला आहे. यामुळेच यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांनी नोएडाला येणे टाळले. अखिलेश यादव यांनीही सत्तेत असताना नोएडाला कधी भेट दिली नाही, तर योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या कार्यकाळात नोएडाला अनेक भेटी दिल्या आहेत.

५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे भाजपचे पहिले मुख्यमंत्री

योगी आदित्यनाथ हे भाजपचे (BJP) पहिले मुख्यमंत्री (CM) असतील, जे 19 मार्च रोजी पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. याशिवाय आमदार म्हणून कार्यकाळ पूर्ण करणारे ते तिसरे मुख्यमंत्री बनतील. याआधी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी 15 मार्च 2012 ते 19 मार्च 2017 या दरम्यान समाजवादी पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. तसेच त्याआधी 13 मे 2007 ते 15 मार्च 2012 पर्यंत बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी मुख्यमंत्री म्हणून ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.

बऱ्याच वर्षांनंतर विधानसभेचा सदस्य होणार युपीचा मुख्यमंत्री

गोरखपूर शहरातून निवडणूक लढवणारे भाजप नेते आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले, तर मुलायमसिंह यादव (Mulayamsingh Yadav) यांच्यानंतर विधानसभेचे सदस्य म्हणून मुख्यमंत्री होणारे ते मुख्यमंत्री ठरतील. योगी हे सलग तिसरे मुख्यमंत्री आहेत, जे MLC म्हणजेच विधान परिषद सदस्य असताना मुख्यमंत्री झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या इतिहासात अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाच्या मायावती (Mayavati) यांनी विधान परिषदेचे सदस्य असताना हा करिष्मा दाखवला आहे. यापूर्वी या दोन्ही नेत्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करण्याचे काम केले आहे.

नारायण दत्त तिवारी यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार योगी

देशात उत्तरप्रदेशचे राजकारण अत्यंत जटिल मानले जाते. आतापर्यंत यूपीच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीमुळे कोणताही विद्यमान मुख्यमंत्री पुन्हा या पदावर विराजमान होऊ शकला नाही. 1985 मध्ये काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी हे एकमेव मुख्यमंत्री बनले ज्यांना सलग दोन वेळा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री असतील, ज्यांनी दुसऱ्या टर्ममध्येही पक्षाला मोठे यश मिळवून दिले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Water Shortage : नंदुरबार शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार; विरचक धरणातील पाणीसाठा घटला

Today's Marathi News Live : सांगलीत कॉफी शॉप तोडफोड प्रकरणी १६ जण ताब्यात

Swati Maliwal Assault Case: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण, संशयित आरोपी बिभव कुमार घरातून गायब

Wedding Viral Video: बापरे! भर मंडपात नवरा-नवरीची हाणामारी; VIDEO होतोय व्हायरल

Jamner Crime : नशेत मुलाने केला पित्याचा खून; दारूसाठी पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्याने कृत्य

SCROLL FOR NEXT