Uttar Pradesh Assembly Election Saam Tv
देश विदेश

Election: काँग्रेसने सपाकडे किती जागांची मागणी केली? अखिलेश यादव यांनी पहिल्यांदाच केला खुलासा

Uttar Pradesh Assembly Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने समाजवादी पार्टीकडे अर्ध्यापेक्षा जास्त जागांची मागणी केली. याबाबत अखिलेश यादव यांनी मोठा खुलासा केला.

Priya More

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका काही महिन्यांतच होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीदम्यान उत्तर प्रदेशमधील राजकारण शिगेला पोहोचले आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एक मोठा खुलासा केला. इंडिया आघाडीमध्ये समाजवादी पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये १८१ जागांवर निवडणूक लढवायची आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडी भाजपचा पराभव करेल असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला.

अखिलेश यादव यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसला किती जागांवर निवडणूक लढवायची आहे याबाबत मोठा खुलासा केला. अखिलेश यादव म्हणाले, आमचे आणि काँग्रेस पक्षाचे संबंध खूप चांगले आहेत. काँग्रेसला १८१ जागांवर निवडणूक लढवायची आहे. समाजवादी पार्टी किती जागांवर निवडणूक लढवणार आहे हे निश्चित झाले आहेत. भविष्यामध्ये आघाडीतील घटक पक्षांमध्ये कोणताही बदलव होणार नाही.

सपा आणि काँग्रेस यांच्यात १७ नोव्हेंबर रोजी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. अखिलेश यादव यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसने १८१ जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, इंडिया आघाडीतील दोन घटक पक्ष, सपा आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा करण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीला सपा आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असून चर्चेनंतर जागावाटप निश्चित केले जाईल. अखिलेश यादवही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

काँग्रेससोबतच्या आघाडीबद्दल अखिलेश यादव म्हणाले, 'समाजवादी पक्षाने अनेक आघाड्या बनवल्या आहेत आणि जी आघाडी सर्वांना एकत्र आणते तीच पुढे जाते. समाजवादी पक्षाचा आघाड्यांचा अनुभव खूप चांगला राहिला आहे. समाजवादी पक्ष बसपासोबतही आघाडीत होता आणि आता काँग्रेस पक्षासोबत असलेल्या इंडिया आघाडीमध्ये आहे. ही तीच आघाडी आहे जी आमच्याकडे आधीपासूनच आहे. मला त्यात कोणताही बदल दिसत नाही.'

उत्तर प्रदेश विधानसभेच्या ४०३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यापैकी २०० जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा काँग्रेसने व्यक्त केली आहे. पण अखिलेश यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट करत हे देखिल सांगितले की, जागांच्या संख्येऐवजी उमेदवार उभे करण्यासाठी त्यांची जिंकण्याची क्षमता हाच एकमेव निकष राहणार आहे. भाजपचा पराभव करणे हेच आमचे प्राधान्य असेल.' दरम्यान, मायावतींसोबतच्या चर्चेच्या प्रश्नावर अखिलेश यादव म्हणाले, एका आघाडीत असताना मी इतर कोणत्याही आघाडीचा विचार करत नाही. इंडिया आघाडी तयार होत असताना जे पक्ष होते ते आजही एकत्र आहेत आणि एकत्र दिसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाथरूमच्या टाईल्स स्वच्छ कश्या करायच्या? महागड्या क्लिनरऐवजी सोपी घरगुती पद्धत समजून घ्या

Rupali Chakankar : माझे नाव, फोटो किंवा ओळख वापराल तर खबरदार! रुपाली चाकणकर यांचा कडक इशारा

Career Growth : नोकरीत तुमची जागा कुणीच घेऊ शकणार नाही! करिअरमध्ये पुढे जायचंय? आत्मसात करा ही ५ कौशल्ये

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये विरोधकांसह सत्ताधारी उत्तरले रस्त्यावर

SBI Data Leak : SBI ग्राहकांच्या बँकेचा डेटा लीक; लाखो रेकॉर्ड चोरी, बँकेने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT