UP Crime News Saam Digital
देश विदेश

UP Crime News: धक्कादायक! पती-पत्नीसह तीन मुलांचा होरपळून मृत्यू , मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

UP Crime News: उत्तर प्रदेशातील बरेलीत एकाच कुटुंबातील पाच जणांना होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये पती, पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Sandeep Gawade

UP Crime News

उत्तर प्रदेशातील बरेलीत एकाच कुटुंबातील पाच जणांना होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये पती, पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला असून २४ तासात अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. फरीदपूर पोलीस ठाण्याच्या मोहल्ला फराखपूरमध्ये ही घटना घडली आहे. अजय गुप्ता (३५ वर्षे), पत्नी अनिता (३२ वर्षे), मुलगा (दिव्यांश, ९ वर्षे), मुलगी दिव्यांग्या (६ वर्षे) आणि मुलगा दक्ष (३ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय गुप्ता हे मिठाईचा व्यवसाय करत होते. तसेत तीन वर्षांपासून ते नातेवाईकाच्या घरात भाड्याने राहत होता. शनिवारी रात्री सर्वजण एकाच खोलीत झोपले होते. पहाटे घरातून धूर येत असल्याचे शेजाऱ्यांना दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर अग्निशमन दल आणि सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांसोबत फॉरेन्सिक टीमही तपासासाठी दाखल झाली. दरवाजा तोडून आत प्रवेश करणाऱ्या पथकाला हे दृश्य पाहून धक्काच बसला. अजय, त्यांची पत्नी आणि मुलांचे जळालेले मृतदेह पडल्याचे टीमला आढळून आले. अजयच्या मृतदेहाजवळ लहान मुलगा आणि मुलीचे मृतदेह आढळून आले. तर मोठा मुलगा दिव्यांश याचा मृतदेह आई अनिताजवळ आढळून आला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजय मिठाई बनवण्यासोबत स्वयंपाकाचे कामही करत असे. तो आपल्या कुटुंबासह राहत असलेल्या घरात दोन खोल्या आहेत. त्यातील एका खोलीत कुटुंब झोपले होते, त्या खोलीत विद्युत मंडळाला दोन हिटर जोडलेले आढळले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार, आयजी डॉ. राकेश सिंह, एसएसपी घुले सुशील चंद्रभान घटनास्थळी पोहोचले आणि माहिती घेतली. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: मकर संक्रांति निमित्त औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी वान दिले

महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT