नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आरजेडीची साथ सोडली आहे. भाजपसोबत जात ते आता 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे, त्यांच्या एनडीएमध्ये सामील झाल्यामुळे महाआघाडीतील पक्षांमध्ये फूट पडली आहे. आधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना ते आयाराम, गयाराम आहे, असं म्हटलं आहे. आता त्यांचे सरकारमध्ये भागीदार असलेल्या तेजस्वी यादव यांनीही नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तेजस्वी म्हणाले की, ते खूप थकलेले नेते आहेत. आम्ही त्यांना 17 महिन्यांत ऐतिहासिक काम करायला लावले. तेजस्वी यांनी जेडीयूबाबतही मोठी भविष्यवाणी केली आहे. नितीश कुमार यांचा पक्ष 2024 मध्येच संपेल, असं ते म्हणाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
याआधी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी मोठे पाऊल उचलले आणि महाआघाडीची साथ सोडून पुन्हा एकदा एनडीएशी युती केली. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली आणि माध्यमांशी संवाद साधला. दीड वर्षांपूर्वी आम्ही केलेल्या महाआघाडीत काहीही चांगले होत नसल्याचे म्हणत नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. आमच्याकडे अनेक तक्रारी येत होत्या आणि त्या आम्ही स्वतः पाहत होतो. त्यामुळे आता या आघाडीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असंही ते म्हणाले. (Latest Marathi News)
नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर तेजस्वी यादवही माध्यमांसमोर आले आहे. पत्रकारांशी संवाद साधत तेजस्वी यादव यांनी संताप व्यक्त केला. नितीश कुमार यांच्यावरही त्यांनी वैयक्तिक हल्ला चढवला. नितीश कुमार खूप दमलेले नेते आहेत, त्यांच्याकडून कोणतेही काम होत नाही, असे ते म्हणाले. आम्हीच 17 महिन्यांत ऐतिहासिक काम केले. त्यामुळे बिहारमध्ये एवढा विकास झाला आहे, जो पूर्वीच्या सरकारच्या काळात होऊ शकला नाही.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नितीश कुमार यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचे त्यांनी सांगितले. नितीश कुमार आमच्यापासून दूर गेले तर आम्हाला काही फरक पडणार नाही. नितीश कुमार यांनी राजीनामा दिला, हा त्यांचा छंद आहे. अयोध्येत राम आणि बिहारमध्ये पलटूराम आहे, असं ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.