UP civic polls saam tv
देश विदेश

UP Late Woman Won Election: मरावे परी कीर्तिरूपे उरावे! मतदारांनी चक्क मृत झालेल्या तरुणीला निवडून दिलं

Voters Elect Woman Who Dies Before Election: उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी चक्क मृत पावलेल्या २५ वर्षीय तरुणीला निवडून दिलं आहे.

Vishal Gangurde

UP Civic Polls News: सध्याचं राजकारण बदलत चाललं आहे. निवडणुकीत आता उमेदवार लाखो रुपये खर्च करत असतात. उमेदवार अनेकांना भेटून पाया पडून मत देण्याची विनवणी करत असतात. मात्र, लोक योग्यच उमेदवारांना निवडून देत असतात. उत्तर प्रदेशमध्येही असाच एक अनोखा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी चक्क मृत पावलेल्या २५ वर्षीय तरुणीला निवडून दिलं आहे. (Latest Marathi News)

उत्तर प्रदेशमधील २५ वर्षांच्या आशियाचं लोकांच्या आयुष्यात आनंद, उत्साह निर्माण करण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आशियाने अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत अनेक लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवत तिला मतदान करण्याची तयारी केली होती.

मात्र, मतदानाच्या काही दिवस आधीच आशियाचा मृत्यू झाला. तरीही अनेकांनी आशियालाच मतदान केलं. आशियाने उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. तरीही आशिया या निवडणुकीत जिंकली.

आशियाचा मृत्यू २० एप्रिल रोजी फुफ्फुस आणि पोटाच्या आजारामुळे मृत्यू मतदानाच्या काही दिवस आधी झाला होता. आशियाचा मृत्यू होऊन मतदानावर काही परिणाम झाला नाही. तरीही लोकांनी आशियाला भरघोस मते दिली. मतमोजणी करण्यात आली, त्यावेळी आशिया निवडणुकीत जिंकल्याची माहिती समोर आली.

उत्तर प्रदेशमधील हसनपूर नगरपालिकेत ३० पेक्षा अधिक वॉर्ड आहेत. या निवडणुकीसाठी १६ एप्रिल रोजी आशियाने अर्ज भरला. आशियाने गेल्या वर्षीच लग्न केलं होते. आशियाचा पती मुंताजीब अहमद असून त्यांचा दूध डेअरीचा व्यवसाय आहे.

मुंताजीब यांनी सांगितले की, 'हसनपूर नगरपालिकेच्या प्रभाग १७ मधील सदस्यपद महिलांसाठी राखीव होते. आशियाने याधी कधीही निवडणूक लढवली नव्हती. तरीही आशियाने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीत अर्ज दाखल केल्यानंतर आशियाने लोकांशी संपर्क वाढवला होता. तिने तिच्या शांत स्वभावाने सर्वांचे मन जिंकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT