High court News एआय फोटो
देश विदेश

Husband-Wife Relations : संमतीशिवाय पत्नीसोबत अनैसर्गिक शरीरसंबंध गुन्हा नाही; हायकोर्टाचा निर्णय, पत्नीचा झाला होता मृत्यू

Chhattisgarh high court News : छत्तीसगड उच्च न्यायालयानं पती आणि पत्नी यांच्यातील अनैसर्गिक शरीरसंबंधांविषयीच्या खटल्यावर महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

Saam TV News

छत्तीसगड उच्च न्यायालयानं सोमवारी एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सज्ञान पत्नीसोबत तिच्या संमतीविना अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले म्हणून आयपीसी कलम ३७६ अन्वये बलात्कार किंवा कलम ३७७ अन्वये अनैसर्गिक शरीरसंबंधांच्या गुन्ह्याखाली खटला चालवला जाऊ शकत नाही, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

एक पुरुष आणि त्याची सज्ञान पत्नी यांच्यात अनैसर्गिक शरीरसंबंध हे त्या व्यक्तीला शिक्षेस पात्र ठरवले जाऊ शकत नाही. या प्रकरणात संबंधिताच्या रुग्णालयात मृत्यू झाला होता. तिला पेरिटोनिटिस आणि रेक्टर परफोरेशन (गुद्द्वारात छिद्र) चा त्रास होता, असं निदान झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.

पत्नीचा रुग्णालयात झाला होता मृत्यू

लाइव्ह लॉच्या रिपोर्टनुसार, अनैसर्गिक शरीरसंबंधांनंतर पत्नीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पेरिटोनिटिस आणि गुद्द्वारात छिद्र असल्याचं निदान झालं होतं. या प्रकरणात नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं म्हटलं की, पत्नी सज्ञान असल्यास तिच्या संमतीशिवाय अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवणे शिक्षेस पात्र ठरू शकत नाही.

डॉक्टरांच्या अहवालानुसार, पत्नीचा मृत्यू पेरिटोनिटिस आणि रेक्टर परफोरेशनमुळं झाला होता. पेरिटोनिटिस पोटामधील सूज यामुळं होतो. रेक्टल परफोरेशन म्हणजे गुदद्वारात छिद्र असतो. हे दोन्ही आजार गंभीर असतात. हे आजार अनेक कारणांमुळं होऊ शकतात. त्यात संसर्ग, जखम किंवा एखादा आजार असू शकतो. या प्रकरणात पत्नीचा मृत्यू अनैसर्गिक संबंधांमुळं झाल्याचं स्पष्ट झालं असलं तरी, पत्नीचे वय १५ वर्षांपेक्षा अधिक असल्यानं तिच्या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले होते.

न्यायालयानं आदेशात काय म्हटलं?

पत्नीचं वय १५ वर्षांपेक्षा अधिक असल्यास पतीकडून कोणत्याही प्रकारचे शरीरसंबंध आणि लैंगिक कृती बलात्कार म्हणू शकत नाही तसेच अशा तऱ्हेने अनैसर्गिक संबंधांसाठी पत्नीची संमती अनिवार्य नाही. त्यामुळं संबंधित अपील करणाऱ्या व्यक्तीविरोधात आयपीसी कलम ३७६ आणि ३७७ अन्वये गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, या प्रकरणात संबंधित पुरुषाला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्याला याच प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं आयपीसी कलम ३७६ (बलात्कार) आणि कलम ३७७ (अनैसर्गिक संबंध), तसेच कलम ३०४ अन्वये दोषी ठरवलं होतं. या प्रकरणी उच्च न्यायालयानं मागील वर्षी १९ नोव्हेंबरला निकाल राखून ठेवला होता. त्यावर सोमवारी १० फेब्रुवारी २०२५ रोजी निकाल देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

CHYD : 'चला हवा येऊ द्या' महाराष्ट्राला खळखळून हसवायला सज्ज; कॉमेडीचं गँगवॉर 'या' दिवसापासून सुरू, पाहा VIDEO

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT