High Court : लग्न केलं म्हणून मालक होत नाही, पत्नीसोबतचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक करणाऱ्या पतीला कोर्टानं झापलं

Allahabad High Court : बेडरूममधील बायकोचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केला, कोर्टाने नवऱ्याची याचिका फेटाळली, अलाहाबादच्या कोर्टात नेमकं काय घडलं? कोर्टानं काय म्हटले?
High Court Decision: बेडरूमधील खासगी क्षणाचा व्हिडीओ लीक, पत्नी पोलिसात तर नवरा कोर्टात, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
calcutta high court Saam TV
Published On

High Court On Husband Wife Relationship : पत्नीसोबतचा बेडरूममधील प्रायव्हेट व्हिडीओ नवऱ्याने व्हायरल केला. पत्नीने पोलीस धाव घेत गुन्हा दाखल केला. तर नवऱ्याने कर्टात धाव घेतली. कोर्टाने याचिका फेटाळत नवऱ्याला झापलेय. लग्न केले म्हणून मालक होत नाही. पत्नीचे स्वत:चे अधिकार अबाधित असतील, असे कोर्टाने सुनावलेय. अलाहाबाद हायकोर्टात नवऱ्याने पत्नीविरोधात याचिका दाखल केली होती. कोर्टाने ती फेटाळून लावली.

अंतरंग क्षणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर सहमती न घेता शेअर करणाऱ्या पतीविरुद्ध पत्नीने मीरजापूरच्या चुनार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी नवऱ्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती विनोद दिवाकर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. पत्नीचे शरीर हे तिच्या स्वतःच्या संपत्तीप्रमाणे आहे. पत्नीचे शरीर, गोपनीयता आणि अधिकार हे तिचे स्वत:चे आहेत, लग्न केले म्हणून ते पतीच्या मालकीचे होत नाहीत, तर एक समान भागीदाराची आहे. पत्नीच्या व्यक्तिमत्वाचा आदर करण्यासाठी बांधील आहे, असे कोर्टाने सुनावणी वेळी सांगितले.

High Court Decision: बेडरूमधील खासगी क्षणाचा व्हिडीओ लीक, पत्नी पोलिसात तर नवरा कोर्टात, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
नियतीचा घाला! झोपेतच गुदमरून अख्खं कुटुंब संपलं, आई-बापासह तीन चिमुकल्यांचा मृत्यू

पत्नीसोबतचे बेडरूमधील खासगी क्षण पतीने गुपचुप कॅमेऱ्यात कैद केले होते. हे व्हिडीओ त्याने पत्नीच्या चुलत भावासोबत शेअर केले. याबाबातची तक्रार पत्नीने पोलीस केली. पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हा रद्द करण्यासाठी पतीने कोर्टात धाव घेतली होती. कोर्टात दाखल याचिकेनुसार, पतीचे म्हणणे आहे की, तो तक्रादाराचा कायदेशीर लग्न केलेला पती आहे, त्यामुळे गुन्हा घडलेला नाही. पण अलाहाबाद कोर्टाने पतीची ही याचिका फेटाळून लावल.

कोर्टात जोरदार युक्तीवाद झाला. तक्रारदार महिलेचा कायदेशीर पती आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कलम ६७ अंतर्गत गुन्हा होत नाही, तो रद्द करावा असे पतीकडून युक्तीवाद करण्यात आला. याला पत्नीकडून प्रत्युत्तर देण्यात आले. पत्नी जर असले तरी तिचा अश्लील व्हिडीओ बनवण्याचा आणि व्हायरल करण्याचा पतील अधिकार नाही. कोर्टाने पतीची याचिका फेटाळून लावत नवऱ्याला झापले.

याचिका फेटाळताना कोर्टाने नवऱ्याला झापले. पत्नीच्या संपतीशिवाय खासगी क्षणाचे व्हिडीओ काढणे आणि शेअर करणे, हे विश्वास तोडण्यासारखे आणि कायद्याचे उल्लंघन आहे. पत्नीचा विश्वास आणि निष्टेचा आदर पतीने ठेवायला हवा. पतीने पत्नीसोबतच्या खासगी क्षणाचे व्हिडीओ शूट करून सोशल करत वैवाहिक संबंधांच्या पावित्र्याचे उल्लंघन केलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com