नियतीचा घाला! झोपेतच गुदमरून अख्खं कुटुंब संपलं, आई-बापासह तीन चिमुकल्यांचा मृत्यू

Family of Five Dies from Suffocation Due to Faulty Heater : श्रीनगरच्या पंद्रेथन परिसरात एका भाड्याच्या घरात कडाक्याच्या थंडीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. हिटरच्या वापरामुळे ऑक्सिजनची कमतरता झाली, पोलिसांनी तपास सुरू केला.
Family of Five Dies from Suffocation Due to Faulty Heater
dead body
Published On

5 member of same family died due to suffocation : कडाक्याच्या थंडीमध्ये एकाच कुटुंबातील आई-वडील आणि तीन चिमुकल्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये घरातील तापमान सामान्य राहावे, म्हणून हिटर वापरण्यात आला होता. परंतु तोच हिटर जिवावर उठल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी रात्री श्रीनगरच्या पंद्रेथन परिसरात घडली. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला, हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यूची ही धक्कादायक घटना रविवारी रात्री उशिरा घडली. मृतक कुटुंब श्रीनगरच्या पंद्रेथन परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होते. कुटुंबाच्या पाच सदस्यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे बेशुद्ध होऊन झाला. हे कुटुंब मूळचे बारामुला येथील आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास वेगाने करण्यास सुरू केला आहे. कुटुंबातील पाचही जणांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झालाय. सध्या जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी आहे. मायनसमध्ये तापमान केलेय. थंडीचा प्रभाव कमी करण्यासाठी हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या हीटिंग साधनांचा वापर करतात, ज्यामुळे खोलीत ऑक्सिजनची कमतरता होऊन अशा प्रकारचे अपघात होतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.

श्रीनगरजवळील पंद्रेथन येथे ही दुर्देवी घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलेय. पंद्रेथन येथील या घटनेची श्रीनगर आणि आजूबाजूच्या परिसरात चर्चा सुरू आहे. प्रत्येकजण हळहळत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. त्यातच जोरदार बर्फवृष्टी होत आहे. रविवारी अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाली. त्यामुळे श्रीनगरचा पारा 2.5 डिग्री सेल्सियसपर्यंत घसरला. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा, बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये आणि मध्य काश्मीरमधील बडगाम आणि गांदरबल जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये बर्फवृष्टी झाली. श्रीनगर शहर आणि दक्षिण काश्मीरच्या काही भागांमध्ये संध्याकाळी उशिरा बर्फवृष्टी झाली. मागील 48 तासांपासून तापमान दोन डिग्री सेल्सियसपेक्षा कमी राहिलेय. शनिवारी कमाल तापमान 1.2 डिग्री सेल्सियस होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com