Accident News Saam tv
देश विदेश

Unnao Hit-and-Run: आमदाराच्या कारनं दुचाकीस्वाराला उडवलं; रेल्वे पुलावरून खाली कोसळून भाजप नेत्याच्या भावाचा मृत्यू

Uttar Pradesh Accident News: उन्नावमध्ये आमदार पास असलेल्या एका कारने ई-रिक्षा आणि दुचाकीला धडक दिली, ज्यामुळे भाजप नेत्याचा भाऊ आशु गुप्ता यांचा मृत्यू झाला.

Bharat Jadhav

  • उन्नावमध्ये आमदार स्टिकर लावलेल्या कारने दिलेल्या धडकेत भाजपा नेत्याचा भाऊ आशू गुप्ता मृत पावला.

  • अपघातात दुचाकीस्वार ३० फूट रेल्वे पुलावरून खाली पडला.

  • रुग्णवाहिका वेळेवर न आल्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

  • कारवर घाटमपूर आमदार सरोज कुरील यांचा पास आढळून आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात हिट अँड रनची धक्कादायक घटना घडलीय. आमदाराच्या नावाचं स्टिकर लावलेल्या कारनं ई रिक्षा आणि दुचाकीला धडक दिली आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. ई-रिक्षा आणि बाईकाला धडक देणारी कारला कानपूरमधील घाटमपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार सरोज कुरील यांच्या नावाचा पास लावला होता. अपघातात मृत पावणारा तरुण हा भाजप नेत्याचा भाव होता.

या घटनेबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आशू गुप्ता असे आहे. तो भाजपच्या एका नेत्याचा भाऊ होता. कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार तरुण रेल्वे पुलावरून सुमारे ३० फूट खाली कोसळला. त्यात तो गंभीर जखमी झाला.

अपघात घडल्यानंतर पोलीस आणि इतर लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. सुरुवातीला मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णावाहिकेला पाचारण केलं, मात्र रुग्णवाहिका वेळेत आली नसल्यानं त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी घटनास्थळावरून एक कार जप्त केलीय. त्यामधून आमदारांचा पास आणि बियरची रिकामी बाटली जप्त करण्यात आलीय. त्यामुळे कारचालक हा नशा करून कार चालवत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. दरम्यान या प्रकरणी आमदार सरोज कुरील यांनी प्रतिक्रिया दिलीय. कार माझाच ड्रायव्हर चालवत होता.

अपघात झाला तेव्हा आपण लखनौमध्ये होतो, असं सरोज कुरील यांनी दिलीय.दरम्यान कारचालक घटनास्थळावरून फरार झालाय. पोलिसांनी अपघातग्रस्त कार घटनास्थळावरून हटवली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय.

या अपघातातील मृत तरुणाच्या भावाने आमदारावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केलीय. या अपघातबाबत उन्नावचे पोलीस अधीक्षक दीपक बकर यांनी अधिकची माहिती दिलीय. या अपघातप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलीय. पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: मराठा आरक्षण आंदोलनासाठी परभणीत पहिले मदत कार्यालयाची स्थापना

Mumbai Maratha Protest : दोन दिवसात सर्व पूर्ववत करा, मुंबई हायकोर्टाचे मराठा आंदोलकांना निर्देश

Lipstick Hacks: तुम्हाला मॅट लिपस्टिकला ग्लोसी लूक द्यायचा आहे का? मग या सोप्या ट्रिक्स नक्की ट्राय करा

Maharashtra Tourism : सप्टेंबरमध्ये भेट द्यावीत अशी महाराष्ट्रातील निसर्गरम्य Top 6 पर्यटनस्थळे

Manoj Jarange: देवेंद्र फडणवीसांमुळे आमच्यातला तिसरा खून झाला, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT