Union Minister Suresh Gopi Saam Digital
देश विदेश

Union Minister Suresh Gopi : 'इंदिरा गांधी या ‘मदर ऑफ इंडिया’; भाजपच्या नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्याचे उद्गार

Indira Gandhi : सुरेश गोपी यांनी लोकसभा निवडणुकीत केरळमधील त्रिशूमधून सीपीएम उमेदवार व्हीएस सुनीलकुमार यांचा पराभव केला आहे. मात्र नुकतेच त्यांनी इंदिरा गांधी यांना ‘मदर ऑफ इंडिया’म्हणून संबोधलं आहे.

Sandeep Gawade

केरळमधील केंद्रीय मंत्री आणि भाजपचे पहिले लोकसभा खासदार सुरेश गोपी यांनी इंदिरा गांधी यांना ‘मदर ऑफ इंडिया’ असं संबोधलं आहे. तर केरळचे माजी मुख्यमंत्री के करुणाकरन यांना ‘धाडसी प्रशासक’ही म्हटलं आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं असून अलिकडेच राजकारणात एन्ट्री केलेल्या मल्याळम अभिनेत्याने काढलेल्या या उद्गारामुळे राजकारण्यांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.

सुरेश गोपी यांनी करुणाकरन आणि माजी मुख्यमंत्री ईके नयनर यांनाही त्यांचे ‘राजकीय गुरू’ म्हणून संबोधलं आहे. दरम्यान त्यांनी मी माझ्या गुरूंना आदरांजली वाहण्यासाठी आलो होतो, त्यामुळे याचा राजकारणाशी संबंध जोडू नये असं आवाहन माध्यमांना केलं आहे.करुणाकरन यांच्या त्रिशूर मतदारसंघातील मुरली मंदिरम या स्मारकाला भेट दिल्यानंतर भाजप नेत्याने ही टिप्पणी केली आहे. सुरेश गोपी यांनी त्रिशूर मतदारसंघात भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (मार्क्सवादी) उमेदवार व्हीएस सुनीलकुमार यांचा ७५ हजार मतांनी पराभव केला आहे. करुणाकरन यांचे सुपुत्र मुरलीधरन तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांना पर्यटन आणि पेट्रोलियम राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुरली मंदिरम स्मारकाला भेट दिल्यानंतर सुरेश गोपी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 'भारतथिंते माथावू (मदर ऑफ इंडिया)' असं संबोधलं. तर करुणाकरन यांना केरळमधील काँग्रेस पक्षाचे जनक म्हटलं आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री के करुणाकरन यांना ‘धाडसी प्रशासक’ही म्हटलं आहे. यावरून केरळमधील काँग्रेसच्या संस्थापकांचा किंवा सह-संस्थापकांचा अनादर नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर गोपी आपल्या पदावरून पायउतार होणार असल्याची चर्चा होती. याचं सुरेश गोपी यांनी खंडन केलं असून काही माध्यमं चुकीच्या बातम्या परसवत असल्याचा आरोप त्यांनी केला. केरळच्या जनतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीयमंत्रिपद भेटणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, असं त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar : 'देवाभाऊ' नेपाळमध्ये काय झालं बघा; शरद पवारांनी शेतकऱ्यांचा प्रश्नांवरून सरकारवर ओढले आसूड

Maharashtra Live News Update: बीड जिल्ह्यात हेलिकॉप्टरच्या साह्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू

Parbhani Rain: परभणीत पावसाचा हाहाकार, गोदावरी नदीला पूर; गावकऱ्यांचा तराफ्यावरून प्रवास| VIDEO

Navi Mumbai Airport : वाह! नवी मुंबई विमानतळाचे इनसाईड फोटो पाहून मन भरून येईल

दिवाळीपूर्वी कुंभ राशीसह 'या' तीन राशींना होणार फायदा, शनीचा नक्षत्रात होणार बदल

SCROLL FOR NEXT