Ramdas Athawale Saam tv
देश विदेश

Ramdas Athawale : दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगवरून वातावरण तापलं; देवेंद्र फडणवीसांकडून कामाला स्थगिती, आठवले म्हणाले...

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : नागपुरातील दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगवरून वातावरण राजकीय वातावरण तापलं आहे. नागपुरातील दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी अनुयायांनी विरोध दर्शवला आहे. आंबेडकरी अनुयायांच्या विरोधानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला स्थगिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतक्रिया दिली आहे. आंबेडकरी जनतेचा विरोध असेल तर माझाही पार्किंगला विरोध आहे, अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी दिली आहे. तसेच यावेळी आठवलेंनी विधानपरिषदेच्या उमेदवारीवरही भाष्य केलं.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले यांनी दीक्षाभूमीतील अंडरग्राऊंड पार्किंगवर भाष्य केलं. रामदास आठवले म्हणाले, 'सरकारने 200 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यावर चर्चा करून पार्किंग अंडरग्राऊंड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची भावना लक्षात घेऊन या कामाला स्थगिती दिली आहे'.

'दीक्षाभूमीपेक्षा पार्किंगला जास्त खर्च होत आहे, अशी लोकांची भावना आहे. लोकांच्या भावनांचा विचार करण्यात आला आहे. आंबेडकरी अनुयायींचा विरोध असेल तर माझाही पार्किंगला विरोध आहे, अशी भूमिका रामदास आठवलेंनी स्पष्ट केली.

...म्हणून आम्ही भाजपवर नाराज - रामदास आठवले

विधानपरिषद उमेदवारीवरून रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. आठवले म्हणाले, 'पंकजा मुंडे यांना जागा मिळाली चांगली गोष्ट आहे.पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवत आहे. रिपब्लिकन पक्षाने एक मंत्रिपद आणि एक विधानपरिषद मागणी केली होती, पण आम्हाला ती दिली नाही. भाजपने आम्हाला जागा दिली नाही, त्याबद्दल आम्ही नाराज आहोत. आम्हाला विधानसभेत ८ ते १० जागा मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

Lebanon pager explosion : लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा भीषण हल्ला, पेजर स्फोटांमागे कुणाचा हात? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT