bihar news  saam tv
देश विदेश

केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ; तरुण थेट लोखंडी पाइप घेऊन घुसला अन्...

Lallan Singh Security Breach At Bihar Event: बिहारमधील लखीसराय येथे केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्या कार्यक्रमात सुरक्षा त्रुटी समोर आली. हातात लोखंडी पाइप घेऊन गर्दीत घुसलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Omkar Sonawane

बिहारमधील लखीसराय येथे केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांच्या कार्यक्रमादरम्यान सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. चानन प्रखंडातील कुंदर बराज गावात केंद्रीय मंत्र्यांच्या स्वागतावेळी एक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ तरुण हातात लोखंडी पाइप घेऊन गर्दीत घुसला आणि तो पाइप हवेत फिरवू लागला. हा प्रकार पाहताच परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह शनिवारी लखीसरायच्या चानन प्रखंडातील कुंदर बराज गावात एकदिवसीय दौऱ्यावर आले होते. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचवेळी एक तरुण हातात लोखंडी पाइप घेऊन गर्दीत आला आणि तो पाइप हवेत फिरवू लागला.

लोखंडी पाइप हातात घेऊन हा तरुण मंत्र्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली आणि सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले. घटना लक्षात येताच ललन सिंह यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी तरुणाला गर्दीतून बाहेर काढले आणि त्याच्या हातातील लोखंडी पाइप हिसकावून घेतला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला नजर कैदेत ठेवले.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या तरुणाने सांगितले की, त्याने बराज पुलाच्या कामावर मजुर म्हणून काम केले होते, मात्र त्याला मजुरीचे पैसे मिळाले नव्हते. याबाबत आपली तक्रार मालकाकडे मांडण्यासाठी तो जात असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण मानसिक रुग्ण असल्याचे दिसून आले आहे. या घटनेनंतर काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

८ तास महत्त्वाचे; महाराष्ट्रासह १५ राज्यात वादळी पावसाची शक्यता; ६० किमी वेगाने वाहणार वारे, IMD चा अंदाज काय?

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या उमरखेडमध्ये स्फोटात दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू

Kalyan: लोकलमधून अचानक ट्रॅकवर पडली 24 वर्षीय तरुणी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Pitru Paksh 2026 : पितृ पक्षात काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

निवडणूक आयोगाचा SIR संदर्भात मोठा निर्णय; महाराष्ट्रासह दिल्लीत दावे, हरकतींसाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT