Amit Shah SaamTV
देश विदेश

Amit Shah on Manipur Clashes: ‘केंद्र सरकार चर्चा करण्यास तयार’; मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्र्यांचं विरोधी पक्ष नेत्यांना पत्र

Amit Shah on Manipur Violence: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षांना मणिपूरच्या मुद्द्यावरून चर्चेस तयार आहे, अशा आशयाचं पत्र लिहिलं आहे.

Vishal Gangurde

Manipur Violence News:

मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांमुळे देशातील सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. मणिपूरच्या मुद्दा लावून धरत विरोधकांनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी मणिपूरचा मुद्दा लावून धरला आहे. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षांना मणिपूरच्या मुद्द्यावरून चर्चेस तयार आहे, अशा आशयाचं पत्र लिहिलं आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रांचे फोटो ट्विट करत माहिती दिली आहे. शहा यांनी म्हटलं की, मणिपूरच्या मुद्द्यावर सरकार फक्त निवेदन करणार नाही तर विस्तृत चर्चा करायला तयार आहे. मणिपूर आपल्या भारताचा महत्त्वाचा भाग आहे, तिथं मागच्या काही महिन्यापासून हिंसा होत आहे. मणिपूरमधील घटना रोखण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचेही शहा यांनी नमूद केले आहे .

अमित शहा यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ‘तुमचं सहकार्य घेण्यासाठी पत्र लिहित आहे. मणिपूर देशातील महत्वाचं राज्य आहे. मे महिन्यांपासून मणिपुरात हिंसाचाराच्या घटना पाहायला मिळत आहे. काही लाजीरवाण्या घटना देखील येथे घडल्या आहेत. या घटनेनंतर मणिपूरमधील जनता मोठ्या आशेने संसदेकडे पाहत आहे’.

शहा पुढे म्हणाले, ‘देशातील लोकांना वाटत आहे की, आपण एकत्र येऊन मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहोत, याची खात्री देऊयात. केंद्र सरकार फक्त निवेदन नाही तर विस्तृत चर्चा करण्यास तयार आहे. आम्हाला सर्व पक्षांकडून मदतीची अपेक्षा आहे. मी पत्राच्या माध्यमातून चर्चा करण्यासाठी पुढे यावे, याची विनंती करत आहे. संसदेची प्रतिष्ठा राखण्यासाठी या कामात हातभार लावावा’. (Amit Shah Latest News)

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पत्रानंतर विरोधकांकडून काय प्रत्युत्तर दिलं जातंय, हे पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT