MVA MP's Meet Amit Shah शिवाजी काळे
देश विदेश

Maharashtra Politics: अमित शाह ॲक्शन मोडमध्ये! राज्यपालांचे वक्तव्य आणि सीमाप्रश्नाबाबत घेणार मोठा निर्णय

MVA MP's Meet Amit Shah: संसदेच्या दालनातच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Shivaji Kale

Amit Shah Latest News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून वारंवार करण्यात येणारी वादग्रस्त वक्तव्ये आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत गृहमंत्री शाह मोठा निर्णय घेणार आहेत. आज महाराष्ट्रातील खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी "दोन्ही प्रश्नांबाबत मला जिथे सांगायचं तिथं मी सांगितलं आहे" असं म्हणत महाराष्ट्रातल्या खासदारांना अमित शाह यांनी आश्वासन दिलं आहे.

आज, महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात ही भेट घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री जे वक्तव्य करत आहेत त्याबाबतची अमित शाह यांना देण्यात आली. तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची माहितीही अमित शाह यांना देण्यात आली. (Maharashtra News)

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि राज्यातील वाचाळवीरांची माहिती आम्ही गृहमंत्री अमित शाह यांना दिली. काही प्रश्न असतात की ज्यामध्ये सर्वपक्षीय बैठकीची गरज असते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशावेळी एकत्र येत विरोधी पक्षाला विश्वासात घेत राज्याच्या हिताचे निर्णय घ्यायला हवेत, असं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं.

मात्र राज्याच्या मुख्यमंत्री वक्तव्य देखील उशीराने येत आहे. महाराष्ट्राचा अपमान होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान होत आहे, अशावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान संसदेच्या दालनातच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अमित शहांना भेटताना शिंदे गटातील खासदारांनी मविआच्या शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाच्या दोन खासदारांना अमित शहा यांच्या बैठकीला नेण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे या दोन्ही खासदारांना ठाकरे गटातील खासदारांनी विरोध केला. त्यामुळे ठाकरे गटांनं विरोध केल्यानंतर दोन्ही खासदार अमित शाह यांच्या केबिन बाहेरच थांबले. त्यामुळे संसदेच्या दालनातच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लोकसभेत गदारोळ, कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब

Mumbai Ganeshotsav : मुंबई गणेशोत्सव मंडळांना महापालिकेचा मोठा झटका, खड्डा खोदल्यास १५ हजार रुपये दंड | VIDEO

Gulabrao Patil : उज्वल निकमांचा ठाकरेंना फोन आणि मी मंत्री झालो, गुलाबराव पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

Google: गुगलचा मोठा निर्णय! 25 ऑगस्टपासून गुगलची ‘ही’ सेवा वापरता येणार नाही

Amravati Crime : वाळू तस्करीला विरोध; युवकावर प्राणघातक हल्ला, तीन जण पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT