Union Minister Ashwini Vaishnaw announces approval of three major railway multi-tracking projects after Cabinet meeting. saam tv
देश विदेश

Cabinet Decision: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वेच्या 3 मेगा प्रकल्पांना ग्रीन सिग्नल; राज्याच्या कोणत्या जिल्ह्यातील रेल्वे मार्गाचा होणार विस्तार?

Cabinet Approves Multi-Tracking Rail Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळात 12,236 कोटींच्या 3 मोठ्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोणता मार्ग या यादीत आहे ते जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • केंद्रीय मंत्रिमंडळाकडून 3 रेल्वे मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी.

  • सुमारे ₹12,236 कोटींच्या प्रस्तावांना हिरवा कंदील.

  • जबलपूर–गोंदिया, पुनरख–किऊल आणि गमारिया–चांडेल मार्गांचा विस्तार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केरळचे नाव बदलून "केरळम" करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यासह केंद्र सरकारने रेल्वेच्या तीन महत्त्वाच्या मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना हिरवा कंदील दिला. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत एकूण 12,236 कोटी रुपयांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे प्रकल्पांमध्ये जबलपूर ते गोंदिया या मार्गाचे दुहेरीकरण, पुनरख ते किऊल या दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन टाकणे तसेच गमारिया ते चांडेल या मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन उभारण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वे मार्गांची क्षमता वाढणार आहे.प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल. तसेच मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक दोन्हींसाठी हे निर्णय फायद्याचे ठरतील, दरम्यान या तीन प्रकल्पांवर सुमारे 9,072 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

रेल्वे मार्गाच्या विस्ताराचा काय होणार फायदा?

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या 8 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या तीन प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या नेटवर्कमध्ये साधरण 307 किलोमीटर रेल्वे मार्गा वाढणार आहे. प्रस्तावित मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे सुमारे 98 लाख लोकसंख्या असलेल्या सुमारे 5,407 गावांमधील दळणवळण सुधारणार आहे. रेल्वे मार्गांची क्षमता वाढल्याने वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होईलच शिवाय भारतीय रेल्वेची कार्यक्षमता वाढेल. सेवा विश्वासार्हता वाढेल. रेल्वे मार्गांच्या संख्येत प्रस्तावित वाढ केल्याने कामकाज सुव्यवस्थित होण्यास आणि प्रवासी आणि मालवाहतुकीची कोंडी कमी होण्यासदेखील मदत होईल.

निधी किती मंजूर करण्यात आलाय?

गोंदिया-जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ₹५,२३६ कोटी मंजूर.

पुनर्ख-क्युलच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गासाठी २,६६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

गम्हरिया-चांदिल तिसऱ्या आणि चौथ्या मार्गासाठी १,१६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

श्रीनगरमधील नवीन एकात्मिक विमानतळ टर्मिनलसाठी १,६६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

अहमदाबाद मेट्रो फेज २ बी च्या विस्तारासाठी १,०६७ कोटी रुपये मंजूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्जला जबरा झटका, स्टार खेळाडू स्पर्धेतून आऊट, कोण आहे तो?

Maharashtra Live News Update: माती विभागात महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी

Gold Rate : गुढीपाडवा धमाका! २४ तासांत सोनं ४ हजारांनी स्वस्त, तर चांदी १३ हजारांनी स्वस्त; पाहा आजचे दर

Horoscope Friday: स्पष्ट बोलणं ठरेल फायद्याचं, ५ राशींना आर्थिक तंगीचा करावा लागेल सामना; वाचा शुक्रवारचे राशी

Dhurandhar 2: 'धुरंधर २'ची त्सुनामी! रणवीरने मोडले आमीर-शाहरुख-सलमानचे रेकॉर्ड, असा पराक्रम करणारा पहिलाच हिरो

SCROLL FOR NEXT