रश्मी पुराणिक -
Rahul Gandhi Reaction On Union Budget 2022: नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे. या अर्थसंकल्पात कोणत्याही वर्गासाठी काहीही नसल्याची प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली (Union Budget 2022 Rahul Gandhi Says Its Modi Governments Zero Sum Budget).
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण ऐकले आणि भाषण संपल्यानंतर ते संसदेबाहेर आले. यादरम्यान त्यांनी मीडियाला कुठलाही संवाद साधला नाही. मात्र, काही वेळातच राहुल गांधी यांनी ट्विट करुन 2022 च्या अर्थसंकल्पाबाबत केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि या बजेटला मोदी सरकारचे शून्य बजेट म्हटले.
"पगारदार वर्ग, मध्यमवर्गीय गरीब, तरुण, शेतकरी आणि एमएसएमईसाठी या अर्थसंकल्पात काहीही मिळाले नाही", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
याआधीही राहुल गांधी यांनी आर्थिक सर्व्हेबाबत म्हटले होते की, देशातील जनता कर (Tax) वसुलीच्या बोजामुळे त्रस्त आहे. तर मोदी सरकारसाठी ही कराची कमाई मोठी उपलब्धी आहे. दृष्टिकोनाचा फरक आहे - त्यांना फक्त त्यांची संपत्ती दिसते, लोकांचे दुःख नाही.
अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्प सादर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला, ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. 2021-22 मध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी आणि खरीप पिकांचे संरक्षण करताना, शेतकऱ्यांच्या खात्यात 2.37 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले. एमएसपीचे हस्तांतरण केले जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
त्याशिवाय, येत्या तीन वर्षात 60 लाख नोकऱ्या उपलब्ध करुन देणार, Infrastructure साठी 20 हजार कोटींचा निधी. 400 वंदे भारत ट्रेन सुरु करणार. 3 वर्षात 400 बुलेट ट्रेन सुरु करणार. 2047 पर्यंतची रुपरेखा यंदाच्या अर्थसंकल्पात आहे. पायाभूत सुविधेसाठी मोठी गुंतवणूक करणार. जागतिक दर्जाच्या सुविधा उभ्या करण्याकडे लक्ष. स्थानीक व्यापाराला चालना देण्यासाठी योजना उभारणार, असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.