Union Budget 2022: क्रिप्टो करन्सीबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, डिजिटल एसेटच्या कमाईवर 30 टक्के कर लागणार

आता क्रिप्टो करन्सीच्या कमाईवर 30 टक्के कर लागणार आहे
cryptocurrency  union budget 2022
cryptocurrency union budget 2022Saam Tv
Published On

नवी दिल्ली: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण (FM Nirmala Sitharaman) यांनी आज आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प देशाच्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षाची ब्लु प्रिंट आहे, असं अर्थमंत्री म्हणाल्या. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्यात, त्यापैकीच एक म्हणजे आता क्रिप्टो करन्सीच्या कमाईवर 30 टक्के कर लागणार आहे (Union Budget 2022 30 percent tax to be charged on income get from cryptocurrency).

cryptocurrency  union budget 2022
Finance Budget 2022 Updates: डिजिटल चलनाच्या घोषणेनंतर शेअर मार्केटमध्ये उत्साह; सेंसेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

क्रिप्टो करन्सीबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. क्रिप्टो करन्सीच्या कमाईवर 30 टक्के कर लागणार, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी केलीये. अनेक दिवसांपासून देशात क्रिप्टो करन्सीच्याबाबत चर्चा सुरु होती. तरुणाई त्याकडे आकर्षित होताना पाहायला मिळाली होती.

cryptocurrency  union budget 2022
Union Budget 2022: 60 लाख नोकऱ्या, कृषी क्षेत्रासाठी 2.37 लाख कोटींची तरतूद, पाहा अर्थसंकल्पातील 8 मोठ्या घोषणा

RBI डिजिटल चलन सुरू करणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) स्वतःचे डिजिटल चलन सुरू करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. रिझव्‍‌र्ह बँक स्वत:चे डिजिटल चलन आणेल, ज्याला डिजिटल रुपया असे म्हटले जाईल, असे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात स्पष्ट केले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com