union budget 2022 saam tv
देश विदेश

Union Budget 2022: 60 लाख नोकऱ्या, कृषी क्षेत्रासाठी 2.37 लाख कोटींची तरतूद, पाहा अर्थसंकल्पातील 8 मोठ्या घोषणा

साम वृत्तसंथा

Union Budget 2022: नवी दिल्ली: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) या आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी या अर्थसंकल्पातून भारताला पुढील 25 वर्षांचा पाया मिळेल, असं निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितलं आहे. तसेच, हा अर्थसंकल्प देशाच्या स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षाची ब्लु प्रिंट आहे, असंही त्या म्हणाल्या. या अर्थसंकल्पात शेतकरी, विद्यार्थी, रेल्वे आणि रोजगाराबाबत मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत (Union Budget 2022 FM Nirmala Sitharaman 8 Big Announcement).

अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पातील 8 मोठ्या घोषणा -

1. पीएम गतीशक्ती योजनेद्वारे एक्स्प्रेस हायवे विकसित करण्याचे ध्येय, या योजनेसाठी 25 हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित, वाहतूक आणि दळवळण वेगवान होणार, प्रवासाचा वेळ कमी होणार आणि त्यासोबतच इंधनाचा खर्च कमी होणार

2. कृषी (Agriculture) क्षेत्रासाठी 2.37 लाख कोटींची तरतूद, कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेतीचा समावेश, जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न, सौर उर्जेचा वापर

3. एलआयसी (LIC) आयपीओ लवकरच बाजारात येणार, या आर्थिक वर्षात हा आयपीओ आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे संकेत

4. देशात 60 लाख नव्या नोकऱ्या (Employment) उपलब्ध होतील, त्यामुळे देशातील वाढत्या बेरोजगारीवर केंद्र सरकार नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणार

5. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 80 लाख घरं येत्या दोन वर्षात तयार केली जाणार

6. पेयजलासाठी तब्बल 1400 कोटी रुपयांची तरतूद, गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार, पेन्नार कावेरी नद्यांसाठी योजना राबवण्यात येईल

7. तीन वर्षात 400 वंदे भारत एक्स्प्रेस, रेल्वेंमध्ये प्रवाशांच्या प्रवासाकरीता मॉडर्न टेक्नॉलॉजी, दळणवळणाचा खर्च कमी करण्यासाठी चार लॉजिस्टीक पार्क सुरु केले जाणार

8. ई - कंटेंटसाठी दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांनी शालेय शिक्षणासाठी 100 चॅनेल्स सुरु करण्यात येतील, विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी नॅशनल टेलीमेंटल हेल्थ प्रोग्राम (National Tele-Mental Health Program) सुरु करण्यात येणार, देशातील २ लाख अंगणवाडी या अद्यावत करण्यात येणार आहे, सोबतच 1 वर्ग 1 टिव्ही चॅनेल सरु करण्यात येणार

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT