Agriculture Budget 2022: शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
Agriculture Budget 2022
Agriculture Budget 2022Saam Tv
Published On

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पातून आपल्याला काय मिळेल याची उत्सुकता सर्वसामान्य जनता, शेतकरी ते उद्योग विश्वाला अनेक दिवसांपासून लागून आहे. या अधिवेशनात निर्मला सीतारामन यांनी आज शेती क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये कृषी क्षेत्रासाठी 2.37 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. (Agriculture Budget 2022 News Update)

Nirmala Sitharaman on Agriculture :

राज्य सरकारांनी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेतीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारांनी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेतीचा समावेश केला आहे.

नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासह आयटी बेस सपोर्ट कसा मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येणार असलयाचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न, सौर उर्जेचा वापर, पेयजलासाठी तब्बल 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार, पेन्नार कावेरी नद्यांसाठी योजना राबवण्यात येईल अशी घोषणा केली आहे.

पुढे त्यांनी सांगितलं की, राज्य सरकारांना त्यांच्या अभ्यासक्रमात फॉर्मिंग कोर्स समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. गंगा कॉरिडॉरमध्ये (५ किमी रुंद कॉरिडॉर) नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल. त्याचबरोबर लघु उद्योगांना (एमएसएमई) क्रेडिट हमी योजनेतून मदत दिली जाईल. लहान शेतकरी आणि लघु आणि मध्यम उद्योगांसाठी रेल्वे नवीन उत्पादने आणि कार्यक्षम लॉजिस्टिक सेवा तयार करेल, असे सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा;

जलसिंचन योजनेतून ९ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार. शेतकऱ्यांकडून मोठी धान्य खरेदी करणार, रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार. तेलबियांच्या शेतीला प्राधान्य देणार. ५ नदीजोड प्रकल्पांची ब्लू प्रिंट तयार. सेंद्रिय शेतील चालना देणार. शेतकऱ्यांना डिजीटल सेवा पुरवणार.

किसान ड्रोन: शेतीत मदत करतील ड्रोन;

तंत्रज्ञानाचा वापर शेतीतही केला जाणार आहे. शेतकरी ड्रोनचा वापर केला जाईल. यासह पीक मूल्यांकन, जमिनीच्या नोंदी, कीटकनाशकांची फवारणी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com