देश विदेश

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या निर्माणाधीन पुलाचा काही भाग कोसळला

Vasad Bridge Collapsed: पुलावर काँक्रीटचे मोठे स्लॅब टाकले जात होते. यातील एक स्लॅब कोसळला असून, सध्या बचावकार्य सुरू आहे.

Bharat Jadhav

गुजरातमधील वासद येथे एक मोठी दुर्घटना घडलीय. निर्माण होत असलेल्या पुलाचा काही भाग अचानक कोसळल्याची घटना घडलीय. अपघातानंतर ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे आतापर्यंत एका मजुराचा मृत्यू झालाय. पुलाच्या ढिगाऱ्याखालून दोन मजुरांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ढिगाऱ्याखाली आणखी कामगार दबल्याची शक्यता आहे.

दरम्यान घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भाग असून तो कोसळला आहे. पुलाचे काम सुरू असताना अचानक पुलाच्या दगडाचा मोठा भाग खाली कोसळला. या दुर्घटनेत काम करणारे ५ हून अधिक मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले.

मोठा आवाज झाल्यानंतर पुलाचा काही भाग काही फूट खाली पडला. आवाज ऐकून आसपास काम करणारे लोक मदतीसाठी घटनास्थळाकडे धावले. दरम्यान या प्रकरणाची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाला देण्यात आली त्यानंतर तेथे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळाभोवती बॅरिकेडिंग करून रस्ता बंद करण्यात आलाय. अनेक रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती स्थिर आहे. अपघातानंतर आणंद पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. स्थानिक प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पुलावर काँक्रीटचे मोठे स्लॅब टाकले जात होते, त्यावेळी यातील एक स्लॅब कोसळला. त्यावेळी तेथे काम करणारे कामगार दबले गेले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.राजुपुराजवळ वसद नदीजवळ हा अपघात झालाय. बांधकाम सुरू असलेल्या पुलावर कामगार काम करत होते असं सांगण्यात येत आहे. यावेळी अचानक लोखंडी गेट तुटून त्यावर ठेवलेले दगड खाली पडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात शालेय पोषण आहार योजना घोटाळ्यावरुन कृती समिती आक्रमक

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT