Russian military
Russian military Saam Tv
देश विदेश

Russia-Ukraine युद्धाचा क्रूर चेहरा; महिलांवर बलात्कारासाठी रशियन सैन्याला वायग्राचा पुरवठा, मुलं-पुरुषांवरही अत्याचार

साम टिव्ही ब्युरो

वॉशिंग्टन : रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukriane war) अद्याप संपण्याचं कोणतंही चिन्ह दिसत नाहीत. युक्रेनमधील अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. तेथील नागरिकांना रोज नव्या आव्हानांना तेथे तोंड द्यावं लागत आहे. लाखो नागरिकांना आपले संसार सोडून स्थलांतर करावं लागलं आहे. मात्र जे अजूनही देशात आहेत त्यांच्यावर विविध प्रकारे अत्याचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. युक्रेनी महिलांवर अत्याचार करण्यासाठी रशियन सैनिकांना वायग्रा पुरवला जात असल्याचा दावा युनायडेट नेशन्सच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. रशियन सैनिक महिलांसह मुलं आणि पुरुषांनाही निशाणा बनवत असल्याचं बोललं जात आहे.

लैंगिक अत्याचाराविषयी बोलताना UNच्या विशेष प्रतिनिधी प्रमिला पॅटन यांनी म्हटलं की, युक्रेनी महिलांवर बलात्कार करण्यासाठी रशियन सैन्याला वायग्रा पुरवला जात आहे. असं जाणूनबुजून केलं जात असून ही रशियन सैन्याची रणनिती आहे. (आंतरराष्ट्रीय बातम्या)

पुढे पॅटन यांनी म्हटलं की, महिलांवर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. मुलं आणि पुरुषांनाही सोडलं जात नाहीये. महिलांना शारीरिक इजा पोहोचवली जात आहे. महिला रशियन सैन्याकडे वायग्रा असल्याचं सांगतं आहेत, यावरुन हे स्पष्ट होत आहे की ही एक लष्करी रणनिती आहे. अशी क्रूरता विचार करुन केली जात आहे, असा दावाही पॅटन यांनी केला आहे.

यूएनमध्ये माहिती देताना पॅटन यांनी सांगितलं की, युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनमध्ये बलात्कार आणि शारीरिक शोषणाची 100 हून अधिक केसेस समोर आल्या आहेत. अनेक प्रकरणे अशी आहेत ज्यांची नोंदच झालेली नाही. रशियन सैन्याकडून अत्याचार झालेल्यांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamannaah Bhatia : चांद तू नभातला नि बावळा चकोर मी

Today's Marathi News Live : देवेंद्र फडणवीस यांना शिरपूरमध्ये आदिवासी कोळी बांधवांनी दाखवले काळे झेंडे

Nanded Crime News: गुंडाचा नांदेड पाेलिसावर गोळीबार, धुमश्चक्रीनंतर तिघांना अटक

Live In Relationship: मुस्लिमांना लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार नाही: हायकोर्ट

Ramdas Athawale: काँग्रेसने माझी ती मागणी कॉपी केली, रामदास आठवले इंडिया आघाडीवर कडाडले

SCROLL FOR NEXT